नाशिक : (चांदवड) सैन्याच्या वर्दीचं पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी रक्ताचं पाणी केलं. ते स्वप्न सत्यात उतरणार तोच जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाने त्यांच्याही स्वप्नांचा काही काळापुरता चुराडा केला. लॉकडाउनमुळे रुजू होण्याचे आदेश मिळत नसल्याने नाशिक, ठाणे, पालघर, रायगड, मुंबई शहर व उपनगर अशा सहा जिल्ह्यांतील जवळपास एक हजार तरुण आपल्या अंगावर सैनिकाचा गणवेश चढवण्यासाठी आतुर झाले आहेत.
तरुणांना सैन्यदलाच्या आदेशाची प्रतीक्षा
ऑक्टोबर, नोव्हेंबर 2019 मध्ये या सहा जिल्ह्यांसाठी सैन्यदलाची भरती मुंबई एआरओकडून घेण्यात आली. या भरतीत हजारो तरुणांनी देशाची सेवा करण्यासाठी आपलं नशीब आजमावलं. कित्येक महिने प्रचंड मेहनत घेऊन रक्ताचं पाणी करून या भरतीत आपल्याला सैनिक व्हायचंच, अशी जिद्द घेऊन आलेल्या जवळपास एक हजार तरुणांची निवड या वेळी झाली. निवड झालेल्या मुलांचे गावोगावी सत्कारही झाले. सैन्यात रुजू होण्यासाठी त्यांना मुंबई कार्यालयाकडून तारीखही मिळाली. तत्काळ त्यांनी आपल्या सामानाची जमवाजमव केली. मात्र मार्चमध्ये सुरू झालेल्या लॉकडाउन ने त्यांचं बोलावणं थांबवल. यातील अनेक तरुण आता सैन्यदलाच्या कार्यालयाशी संपर्क करतात, तेव्हा त्यांना तुम्हाला लवकरच बोलावलं जाईल, असे सांगितले जाते. त्यामुळे सर्वांनाच आता रुजू होण्यासाठी कधी बोलावले जाते, याची प्रतीक्षा आहे.
अशी झाली होती भरती
जिल्हे --- नाशिक, ठाणे, पालघर, रायगड, मुंबई शहर व उपनगर
निवड झालेले तरुण --- एक हजार
भरती तारीख --- 13 ते 23 डिसेंबर
अंतिम निवडयादी प्रसिद्ध --- 11 फेब्रुवारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.