नाशिक रोड : जळगाव जिल्हा प्रशासनाकडून न्याय मिळत नाही म्हणून भडगाव तालुक्यातील तरुणाने विभागीय महसूल आयुक्त कार्यालय समोर मंगळवारी (ता. ४) आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. नाशिक रोड पोलिसांनी तरुणास तत्काळ ताब्यात घेतले.
जळगाव जिल्हा प्रशासनाकडून न्याय मिळत नाही म्हणून भूषण नामदेव पाटील (रा. कजगाव ता.भडगाव जि. जळगाव) याने विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात येऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. नाशिक रोड पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला असून पोलिसांनी आत्मदहन करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतल. महसूल उपायुक्त रमेश काळे यांनी या तरुणांची कैफियत समजून घेतली असून त्याला न्याय देण्याचे आश्वासनही दिलंय. (youth attempted suicide in front of Divisional Commissioner office Nashik Latest Marathi News)
मौजे कजगाव (ता.भडगाव, जि. जळगाव) येथील गट क्र.३०५, क्षेत्र हे. २८ ९५ आर हा ग्रामपंचायत मालकीचा असून सदर गट सरकारी आहे. यात चालु झालेल्या उत्खननाबाबत खदान मालकांविरुद्ध मोठ्या प्रमाणात गौण खनिज चोरी केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करावी यासाठी तहसीलदार, जिल्हाधिकारी (जळगाव) यांना निवेदन दिले. उपोषण केले तरी कारवाई झाली नाही. त्यामुळे आत्मदहन करण्याची वेळ आली, अशी माहिती भूषण पाटील यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.