Nashik Crime News : ‘नशेडी’ म्हणून हिणवल्यानेच ‘त्याने’ केली आत्महत्या; मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल

Death
Deathesakal
Updated on

Nashik News : अंबड लिंक रोडवरील संजीवनगरमध्ये सप्टेंबरमध्ये नाशिकमध्ये सुटीनिमित्त आलेल्या युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती.

याप्रकरणी पोलिसांच्या तपासाअंती मित्रांनी सतत ‘नशेडी’ असे हिणवत मित्रांमध्ये बदनामी केल्यानेच त्या युवकाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.(youth committed suicide due to defamation among friends nashik crime news)

त्यानुसार तिघा मित्रांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सौरव संजयकुमार पांडेय (२५, रा. गजानन रो हाउस, संजीवनगर, अंबड) असे मयत युवकाचे नाव आहे. सौरव हा पुण्यातील खासगी आस्थापनांमध्ये कामाला होता.

११ सप्टेंबरपूर्वी काही दिवस आधी संजीवनगरमधील आई-वडिलांच्या घरी आला होता. सौरवला व्यसने जडल्याने तो नेहमी त्याच अवस्थेत राहत होता.मित्र संशयित अजय सरोज, विजय सरोज व अभी पवार (रा. नाशिक) हे तिघे सौरवला वारंवार ‘तू नशेडी आहेस, आमच्या सोबत राहत जाऊ नको’, असे बोलून त्यांची मित्रांमध्ये बदनामी केली.

Death
Nashik Crime: घरगुती भांडणाच्या रागातून पतीचा पत्नी अन तिच्या नातेवाईकांवर हल्ला; स्वत: लाही संपवण्याचा प्रयत्न

तसेच मारून टाकण्याची धमकी देत वारंवार नशेडी म्हणून त्याला हिणवत असल्याने तो पुरता घाबरला होता. यामुळे त्याने तिघांच्या जाचास कंटाळून ११ सप्टेंबरला राहत्या घरात आत्महत्या केली.

तसेच आत्महत्या करण्यापूर्वी सौरवने आई अनिता हिस तिघा संशयितांची तक्रार केली होती व ते हिणवत असल्याचे सांगितले होते. याबाबत आकस्मिक मृत्यूच्या नोंदीचा तपास करण्यात आल्यावर सौरवची आई अनिता संजयकुमार पांडे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक ए. के. पाडेकर करत आहेत.

Death
Nashik Crime: सरकारी डॉक्टरला मारहाणप्रकरणी कोर्ट उठेपर्यंत शिक्षा; आरोपीला 5 हजारांचा दंडही ठोठावला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.