Nashik : निमगाव वाकडा येथील चेतन सयाजी गायकर (वय ३६) यास कोब्रा जातीच्या नागाने चावा घेतला. त्याला गंभीर परिस्थितीत येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
डॉक्टरांनी एकुतला एक मुलाचे प्राण वाचविल्याने आईवडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. (youth from Nimgaon Wakda bitten by snake life saved by efforts of rural hospital doctors Nashik)
गुरुवारी (ता. १०) सकाळी साडेनऊला शेतातील सोयाबीनमधून जात असताना चेतनच्या डाव्या पायाला कोब्रा जातीच्या नागाने चावा घेतला. ही गोष्ट लक्षात येतात चेतनने डावा पाय जोरात झटकला. मात्र, कोब्रा पायालाच चिटकला होता.
त्याने पुन्हा प्रयत्न करून नागाला बाजूला केले. नंतर त्याने तातडीने मोबाईलवरून वडिलांना घटना सांगितली. वडिलांनी आईच्या मदतीने स्कुटीवरून झिमझिम पावसात ग्रामीण रुग्णालयात नेत होते.
घरापासून पाच मिनिटाच्या अंतरावर चेतनची शुद्ध हरपल्याने त्याने आईच्या अंगावर मान टाकून दिली. वडिलांनी धीर न सोडता आपल्या एकुलता एक मुलाला आईच्या मदतीने दवाखान्यात दाखल केले. तोपर्यंत विष सर्व शरीरात पसरले होते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
घटनेचे गांभीर्य ओळखून डॉ. स्वप्नील पाटील यांनी स्टाफच्या मदतीने तातडीने उपचार सुरू केले. डॉक्टरांनी शर्तीने चेतनला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. त्यामुळे सयाजी गायकर व सिंधूमती गायकर यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले व त्यांनी डॉ. स्वप्नील पाटील यांचे आभार मानले.
"चेतनला दवाखान्यात आणले तेव्हा परिस्थिती अतिशय गंभीर होती. त्याच्या आईवडिलांनी योग्य वेळेत त्याला दवाखान्यात दाखल केले. त्यामुळेच चेतनचा जीव वाचला. स्टाफच्या मदतीने त्याचे प्राण वाचवू शकलो."
-डॉ. स्वप्नील पाटील, वैद्यकीय आधिकारी, ग्रामीण रुग्णालय, लासलगाव
"माझा एकुलता एक मुलगा चेतनला डॉक्टरांनी मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. माझे कुटुंब नेहमी डॉक्टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे ऋणी राहील."
-सयाजी गायकर, चेतनचे वडील, निमगाव वाकडा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.