Nashik News : येवल्यात नायलॉन मांजाने तरुण जखमी; गळा चिरल्याने पडले 10 टाके

Injured Youth
Injured Youthesakal
Updated on

येवला (जि. नाशिक) : नायलॉन मांजावर बंदी असताना येथे सर्रासपणे विक्री होत आहे. त्यामुळे हा मांजा जीवघेणा ठरू पाहत असून रविवारी (ता. ८) शहरातील कोटमगाव रोड वर दुचाकी वरून जात असणाऱ्या तरुणाचा नायलॉन मांजाने गळा चिरून दहा टाके पडले आहे.

यावर्षी ही सलग चौथी घटना असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Youth injured by nylon manja in Yeola 10 stitches for throat slit Nashik News)

मकरसंक्रांत सण आठवड्यावर आला असून मांजा बनवणे, पतंग खरेदीसह येवलेकर पतंगोतस्वाच्या तयारीला लागले आहे. नायलॉन मांजामुळे अनेकांचे गळा चिरणे, हात कापणे अशा घटना होत असतात.

नायलॉन मांजावर बंदी असतानाही अनेक पतंग शौकीन खुलेआम याचा वापर करतात. त्यामुळे प्रत्येक वर्षी नागरिक जखमी होण्याच्या घटना मकरसंक्रांतीच्या काळात घडत असतात. मात्र, यावेळी संक्रांत दूर असतानाच याचा फटका बसू लागला आहे.

चोरी छुपे नायलॉन मांजाची खरेदी-विक्री होत आहे. आरोग्यासाठी घातक असलेल्या या मांजावर न्यायालयाने घातलेली बंदी धाब्यावर बसवीत विक्रेते चोरी छुपी मांजा विकत असून पादचारी, दुचाकीस्वार आणि पक्षी या मांजाचे बळी ठरत आहेत.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

Injured Youth
Nashik News : प्रवासी गाडी, एसटी बसचा लासलगाव फाटा येथे अपघात

मागील महिन्यात दोन-तीन घटना घडलेल्या असताना रविवारी (ता. ८) सकाळच्या सुमारास रितेश मुथा हा तरुण दुचाकीने नागडे बायपास रस्त्याने जात होता. यावेळी अचानक गळ्याला नायलॉन मांजा अडकल्याने त्याचा गळा चिरला गेला.आजूबाजूच्या लोकांनी जखमी रितेशला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.

डॉ. तुषार साळुंखे यांनी तत्काळ रीतेशच्या गळ्याला दहा टाके घालून औषधोपचार केले. दरम्यान, शहरात नायलॉन मांजा विरोधात पोलिस प्रशासनाची धडक मोहीम सुरू असतानाही नायलॉन मांजाने जखमी होण्याच्या घटना मात्र सुरूच आहे.

Injured Youth
Nashik News : धुक्यामुळे महामार्ग वाहतुकीवर परिणाम अन् शेतकऱ्यांचा औषध फवारणीचा खर्च वाढला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.