Nashik News : शहरातील सटाणा नाका बोरसे नगर भागातील १८ वर्षीय तरुणाचे ५० लाखाच्या खंडणीसाठी अपहरण झाल्याने खळबळ उडाली होती. शुक्रवारी (ता.३०) रात्री बाराच्या सुमारास डीके कॉर्नर चौकात हा प्रकार घडला.
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तीन वेगवेगळे पथक तयार करत अपहरणकर्त्या एका संशयिताला अटक केली. त्याच्याजवळून गावठी बनावटीचे पिस्तुल व कोयता जप्त करण्यात आला. अपहरण झालेल्या मुलाचीही पोलिसांनी सुटका केली. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र स्वागत होत आहे.(Youth kidnapped for ransom of 50 lakh kidnapper arrested within twelve hours Nashik Crime news)
या अपहरण प्रकरणात आणखी काही तरुणांचा सहभाग असण्याची शक्यता असल्याने अटक केलेल्या अपहरणकर्त्या तरुणाचे नाव सांगता येणार नाही असे अपर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती यांनी पत्रकारांना सांगितले.
सुबोध कापडे (वय १८) या तरुणाचे डीके चौक भागातून अपहरण झाले. अपहरणकर्त्यांनी त्याला पळवून नेत डांबून ठेवले होते. यानंतर अपहरणकर्त्यांनी सुबोधच्या कुटुंबियांना ५० लाख रुपये द्या नाहीतर त्यास ठार मारतो अशी धमकी दिली होती. या प्रकरणी शनिवारी (ता. १) सकाळी आनंद वाल्मिक कापडे (४२, रा. बोरसे नगर, सटाणा नाका) यांच्या तक्रारीवरुन कॅम्प पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
घटनेचे गांभीर्य व खंडणी रक्कम पाहता पोलिसांनी ही माहिती जिल्हा पोलिस अधिक्षकांना कळविली. पोलिस अधिक्षक शहाजी उमाप, अपर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती, उपअधिक्षक तेगबीरसिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक देवेंद्र शिंदे, सागर शिंपी, उपनिरीक्षक संदीप पाटील, कॅम्प पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश काळे, उपनिरीक्षक सुनिता कोळपकर आदींसह सहकाऱ्यांचे तीन स्वतंत्र पथक तयार करण्यात आले.
या पथकाने सर्वंकष चौकशी करुन मुख्य संशयिताला चर्चेसाठी बोलावून अटक केली. त्याच्या जवळून गावठी पिस्तुल व कोयता जप्त करण्यात आला. या प्रकरणात आणखी दोन ते तीन संशयित असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.पोलिस अटक केलेल्या अपहरणकर्त्याची कसून चौकशी करत असून उर्वरित संशयितांचा शोध घेत आहेत.
या कारवाईत पोलिस नाईक शरद मोगल, मनोहर बाचकर, आनंद गावंडे, विलास बागडे, रुपचंद पारधी, सिकंदर कोळी, विजय वाघ, सुभाष चोपडा, नयन परदेशी, योगेश कोळी, दत्ता माळी, चंद्रकांत कदम, गौतम बोरोडे, मनिषा पवार आदींनी भाग घेतला.
आप्तस्वकियांचाच डाव
सुबोध कापडे याच्या कुटुंबियांना शेत जमीन विक्रीतून काही दिवसापूर्वीच एक कोटीपेक्षा अधिक रक्कम मिळाली होती. याबाबत काही आप्तेष्टांना माहिती होती. त्यातीलच एकाने सुबोधच्या अपहरणाचा डाव रचला असे समजते. यात सुबोधचा चुलत भाऊ मुख्य सुत्रधार असल्याची परिसरात चर्चा होती.
त्याने अन्य तीन ते चार साथीदारांच्या मदतीने सुबोधचे अपहरण केले. पोलिसांच्या वेगवान तपासामुळे त्याच्या मनसुब्यावर पाणी फिरले. सुबोध सहीसलामत घरी परतला. सुबोधचा या प्रकरणाशी काही संबंध आहे की काय याचीही पोलिस चौकशी करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.