आजी-आजोबांची भेट.. अवघड वळणाचा घाट.. जणू वाट बघत होता तिघांचा काळ

ghat.jpg
ghat.jpg
Updated on

नाशिक / सटाणा : तिघे दुचाकी वरून वयोवृद्ध आजी-आजोबांना भेटण्यासाठी गेले होते. सायंकाळी पाचला तिघे पुन्हा आखतवाडे येथे जाण्यासाठी दुचाकीवरून निघाले. सटाण्यापासून जवळच असलेल्या श्रीक्षेत्र दोधेश्‍वर येथील घाटातील अवघड वळणावर जणू त्यांची वाट बघत होता त्यांचा काळ...

अशी घडली घटना

आखतवाडे (ता. बागलाण) येथून दीपक जिभाऊ पिंपळसे (वय 18), विशाल पिंपळसे (16) व प्रकाश संजय पिंपळसे (12) हे तिघे दुचाकी (एमएच 41, एच 6729)वरून जुनी शेमळी येथे वयोवृद्ध आजी-आजोबांना भेटण्यासाठी गेले होते. सायंकाळी पाचला तिघे पुन्हा आखतवाडे येथे जाण्यासाठी दुचाकीवरून निघाले. सटाण्यापासून जवळच असलेल्या श्रीक्षेत्र दोधेश्‍वर येथील घाटातील अवघड वळणावर दीपक पिंपळसे याचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि कड्यावरील एका मोठ्या खड्ड्यात तो दुचाकीसह जाऊन आदळला. या अपघातात दीपकच्या डोक्‍याला गंभीर मार लागल्याने तो जागीच ठार झाला, तर इतर दोघे गंभीर जखमी झाले. 

शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच बगडाणे तत्काळ घटनास्थळी पोचले. त्यांनी रुग्णवाहिकेतून गंभीर जखमी विशाल पिंपळसे याला नाशिकला हलविले. सटाणा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी हलविला. विच्छेदनानंतर मृत दीपकवर रात्री आखतवाडे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले. सहाय्यक पोलिस निरीक्षक देवेंद्र शिंदे तपास करीत आहेत.  

अपघाताचा गुन्हा दाखल

वयोवृद्ध आजी-आजोबांना भेटून दुचाकीवरून घरी परतताना श्रीक्षेत्र दोधेश्‍वर (ता. बागलाण) येथील घाटातील अवघड वळणावर रविवारी (ता. 31) सायंकाळी पाचला झालेल्या भीषण अपघातात युवक जागीच ठार झाला, तर इतर दोघे गंभीर जखमी झाले. सामाजिक कार्यकर्ते श्‍याम बगडाणे यांनी एका गंभीर जखमीस तत्काळ नाशिकला हलविले. सटाणा पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.