Nashik CIDCO Crime : लहान मुलांच्या भांडणातून युवकाचा खून; सिडकोतील घटना

Youth killed due to children dispute cidco nashik crime news
Youth killed due to children dispute cidco nashik crime newsesakal
Updated on

Nashik CIDCO Crime : संजीवनगर येथील खंडेराव मंदिर परिसरात लहान मुलांच्या भांडणातून दहा ते बारा जणांच्या टोळक्याने दोन युवकांवर धारदार शस्त्राने वार करून प्राणघातक हल्ला केला.

यात मेराज खान (वय १८) याचा जागीच मृत्यू झाला. त्याचा नातेवाईक इब्राहिम खान (२३) याच्यावर गंभीर वार करण्यात आले. ही घटना गुरुवारी (ता. १०) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. (Youth killed due to children dispute cidco nashik crime news)

खंडेराव मंदिर परिसरात राहणारे इब्राहिम खान व मेराज खान त्यांच्या घराजवळ उभे असताना रिक्षातून आलेल्या दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. मेराज याच्या छातीत चाकू, चॉपरसारख्या धारदार शस्त्राने वार केले. यामुळे मेराज जागेवरच कोसळला.

मेराजच्या नातेवाइकांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत त्यास तत्काळ रुग्णवाहिकेची वाट न बघता दुचाकीवरूनच जिल्हा रुग्णालयात नेले. दुचाकी थेट वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत नेत त्यावर तत्काळ उपचार करण्यास सांगण्यात येत होते. दुसरा गंभीर इब्राहिमलाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख, सहाय्यक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे, पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे, निरीक्षक प्रमोद वाघ यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Youth killed due to children dispute cidco nashik crime news
Crime News : तरूणावर गोळीबाराचा थरार सीसीटीव्हीत कैद; तिसरी गोळी अडकल्याने आकाश बचावला

मेराज खान व गंभीर जखमी इब्राहिम खान यातील एकाचा मासेविक्रीचा व्यवसाय, तर दुसऱ्याचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. दरम्यान, पोलिसांनी या हल्ल्याप्रकऱणी दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतल्याचे समजते. रात्री उशिरापर्यंत अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

मृतदेह पोलिस आयुक्तालयात

मेराज खान याचा मृतदेह घेऊन नातेवाईक व मित्रपरिवाराने थेट पोलिस आयुक्तालय गाठले. जोपर्यंत मारेकऱ्यांना अटक हहोत नाही तोपर्यंत येथून हलणार नसल्याची भूमिका घेत ठिय्या देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढून योग्य ती कारवाई होईल, असे आश्वासन दिल्यानंतर सर्व पुन्हा जिल्हा रुग्णालयात गेले.

Youth killed due to children dispute cidco nashik crime news
Crime News : मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; पोलीसांचा छापा, एकाला अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.