Nashik : मालेगावी खेळाडूंचा 'रात्रीस खेळ चाले!'

sports during Night
sports during Nightesakal
Updated on

मालेगाव कॅम्प (जि. नाशिक) : खेळ (Sports) कोणताही असो, पहाटेपासून सूर्यास्तपर्यंतचा सरावासाठी (Pratice) सर्वमान्य काळ! मात्र या वेळापत्रकाला मालेगाव शहर अपवाद आहे. दिवसा मोलमजुरी करणारे मुस्लिम युवक रात्री दिव्यांच्या उजेडात आवडत्या खेळात रमतात. संस्थाचालक व क्रीडाशिक्षकांनी मिळवून दिलेल्या संधीचं सोनं करत हरहुन्नरी खेळाडू दर वर्षी थेट राष्ट्रीय पातळीवर (National Level) धडक मारत आहेत. अनेक अडथळ्यांना चितपट करत रात्री येथील विविध खेळांची मैदाने सजतात. रात्री खेळाडूंना मोफत सराव, सुविधा उपलब्ध करणाऱ्या मालेगाव या अजब शहराची ही गजब गोष्ट! शूटिंग बॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, टेबल टेनिस, बुद्धिबळ, कॅरम, मार्शल आर्ट, कुस्ती या खेळात येथे मार्गदर्शन मिळते. क्रीडाशिक्षकांनी शाळेसह रात्रीचे जादा काम आनंदाने स्वीकारले आहे. रोज तब्बल सहाशे ते सातशे खेळाडू शहरातील तीन मैदानांवर व इनडोअर संकुलात सराव करतात. (youth play their favorite sport at night under the lights in Malegaon Nashik sports News)

दिवसा काबाडकष्ट करावे लागत असल्याने खेळाडू तनमनाने घाम गाळतात. गरिबांच्या लेकरांसाठी खेळाची दुनिया ‘कोसो दूर’ असते हे चित्र क्रीडाशिक्षकांनी मेहनतीने पुसत शहराला नवी ओळख दिली आहे. ऊर्दू शाळातील क्रीडाशिक्षकांच्या प्रामाणिक प्रयत्नांना संस्थाचालकांनी शाळांची मैदाने खुली करून दिलीच सोबत वीजबिलाची हमीही घेतली. शहरातील एटीटी हायस्कूल, मालेगाव हायस्कूल व स्वेस हायस्कूलमध्ये रात्रीचे क्रीडा सामने भरतात. खेळ जिद्द, आत्मविश्वास आणि जय-पराजय पचवण्याचे सामर्थ्य खेळाडूला देत असतो. सृजनशील माणूस घडवण्याचे खेळ सर्वोत्तम माध्यम मानले जाते. इच्छाशक्ती प्रबळ असेल तर संकटे पार करत खेळाची दुनिया सजते. अत्यंत दाट वस्ती, सुरक्षित व खुल्या मैदानाची वाणवा प्रचंड समस्यांचा विळखा असूनही येथील क्रीडाविश्वात नावलौकिक मिळवत आहे. रात्रीच्या वेळी शिस्तबद्ध खेळाचे विलोभनीय दृश्य मालेगाव शहराची नवी ओळख देत आहे.

खेळासाठी सर्वस्व

रात्री आठ वाजले, की मालेगाव शहरातील ऊर्दू शाळांची मैदाने खेळाडू व प्रेक्षकांच्या गर्दीने फुलायला लागतात. हायमास्टच्या उजेडात मध्यरात्रीपर्यंत विविध खेळांच्या स्पर्धा येथे रंगतात. चोवीस तासांपैकी रात्री शिवाय येथील खेळाडूंना संधी नाही. खेळाच्या मैदानातून विभाग, राज्य आणि थेट राष्ट्रीय खेळाडू घडत आहेत. मैदानावर राष्ट्रीय खेळाडूपर्यंत मैदान जिंकणारे खेळाडू गरिबीशी संघर्ष करत असतात. झोपडपट्टीत राहून काबाडकष्ट करणाऱ्या विविध खेळातील प्रतिभावंत खेळाडूंना मालेगाव पीटी टीचर असोसिएशन संस्था मदतीला धावून आली आहे. तीस शिक्षक थेट राष्ट्रीय खेळाडू घडवत आहेत.रात्री सराव करणाऱ्या खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर चमक दाखवत थेट आशियाई स्पर्धेत स्थान पटकावले आहे. शूटिंगबॉलच्या भारतीय संघात येथील वकार अंजुम अब्दुल मलिक व मोहम्मद जाहिद अब्दुल गफार यांचा समावेश आहे. जूनमध्ये दिल्लीत आशियाई स्पर्धा होणार आहे. भारताच्या संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या खेळाडूंनी मालेगाव शहराला आंतरराष्ट्रीय लौकिक मिळवून दिला आहे.

sports during Night
वीटभट्टी व्यवसायाला महागाईचे चटके; मागणीत घट

रात्री सराव करणाऱ्या खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर चमक दाखवत थेट आशियाई स्पर्धेत स्थान पटकावले आहे. शूटिंगबॉलच्या भारतीय संघात येथील वकार अंजुम अब्दुल मलिक व मोहम्मद जाहिद अब्दुल गफार यांचा समावेश आहे. जूनमध्ये दिल्लीत आशियाई स्पर्धा होणार आहे. भारताच्या संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या खेळाडूंनी मालेगाव शहराला आंतरराष्ट्रीय लौकिक मिळवून दिला आहे.

sports during Night
सटाणा तालुक्यात पेट्रोल टंचाई; वाहनांच्या लांबच लांब रांगा

"मालेगाव शहरात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय उपलब्ध होणे अत्यंत गरजेचे आहे. राष्ट्रीय व राज्य खेळाडूंना नोकरीत संधी देतांना ऊर्दूत लेखी परीक्षेची संधी मिळायला हवी."

- जाहिद हुसेन, प्राचार्य, मालेगाव हायस्कूल

खेळाडू इतक्या गरीब वर्गातील आहेत, की त्यांना सकस आहारही पुरेसा मिळत नाही. मात्र खेळावर नितांत प्रेम करणारे हे शहर खेळाडूंना सतत प्रोत्साहन देत असते.

- जुबेर शेख, अध्यक्ष, मालेगाव पीटी टीचर असोसिएशन संस्था, मालेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.