वणी : टिटवे, ता. दिंडोरी येथून वांजुळे, ता. दिंडोरी येथील युवकाचे अपहरण करीत खून केल्याची घटना घडली असून संशयित आरोपींनी खूनाचा उलगडा होवू नये म्हणून मृतदेह जंगलात खड्डा खणून पुरुन दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे. (youth who kidnapped from Titwe murdered dead body buried at vani Nashik Crime)
याबाबत पोलिसांनी दिलेली माहीती अशी हरीश्चन्द्र कचरु शेवरे वय 36 रा. वांजुळे ता. दिंडोरी हा १० डिसेंबर पासून राहात्या घरातून बेपत्ता असल्याची खबर वणी पोलिसांत नोंद करण्यात आली होती.
त्यानूसार पोलिसांनी टिटवे व वांंजुळे परीसरात केलेल्या चौकशी केली असता, टिटवे येथील अशोक नवले यांचे किटकनाशक दुकानासमोरुन छगन पुंडलीक गांगोडे वय 27, रा.वारे ,ता.दिंडोरी, दिपक पुंडलिक हिंडे वय 19 ,रा.तळ्याचा पाडा, मनोहर उर्फ मनु अंबादास गांगोडे वय 24, रा. वारे, अशोक कडु नवले वय 36, रा.टिटवे, पंडित साहेबराव शेळके रा. टिटवे, देवीदास वसंत गांगोडे रा.भोकरपाडा, खंडु उर्फ महेन्द्र देवीदास गांगोडे वय 33, रा.वारे अशा सात जणांनी बेपत्ता असलेल्या हरीश्चद्र शेवरे यास अज्ञात वाहनात जबरदस्तीने बसवुन खून करण्याच्या हेतुने अपहरण केल्याची माहीती मिळाली.
त्यानूसार सदर संशयिताविरोधात पोलिस उपनिरीक्षक विजयकुमार कोठावळे यांनी फिर्याद दिल्याने या संशयीताविरोधात अपहरणाचा गुन्हा शुक्रवारी, ता. १६ दाखल करण्यात आला होता.
दरम्यान पोलिसांनी संशयिताची अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर किरकोळ शाब्दिक वादातुन शेवरे पासून होत असलेल्या सततच्या त्रासातून खून करण्यात आल्याची माहीती प्राप्त झाली.
तसेच वारे गाव परीसराच्या पुढे डोंगराळ भागात खड्डा करुन शेवरेचा मृतदेह पुरण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. संशयीतापैकी एकास घटनास्थळी नेल्यानंतर माहितीनुसार मृतदेह बाहेर काढुन घटनास्थळावर उत्तरीय तपासणी करण्यात आली.
एकुण या प्रकरणात संशयीतांची संख्या आठ असल्याची माहीती मिळाली आहे. सदर प्रकरणी अप्पर पोलिस अधिक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय बांबळे यांनी भेट देवून तपासाठी मार्गदर्शन केले असून सपोनि निलेश बोडखे अधिक तपास करत आहेत.
दरम्यान फोरेन्सिक टिमने घटनास्थळ परीसरातून रक्ताचे डागाचे नमुने व आवश्यक नमुने संकलीत करण्यासाठी भेट दिली आहे. मृतदेहाचे शवविच्छेदनासाठी वैद्यकिय अधिकाऱ्यांना घटनास्थळीच पाचारण करण्यात आल्याची पुढील तपास पोलिस करीत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.