ZP Education Black Market: जिल्हा परिषदेत वेतन, भविष्यनिर्वाह निधी पथकातील ‘एजंटगिरी’!

वर्षानुवर्षांपासून तेच तेच अधिकारी, कर्मचारी टेबलावर
ZP Education Black Market
ZP Education Black Marketesakal
Updated on

ZP Education Black Market : प्राथमिक व माध्यमिक विभागातील शिक्षकांना वेतन फरक बिल काढण्यापासून ते वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करण्यापर्यंत जे काही काम करायचे असेल, त्या कामासाठी माध्यमिकच्या वेतन व भविष्यनिर्वाह निधी पथकाकडे एजंट नियुक्त करण्यात आले असून, कुठलेही काम करताना एजंटला टक्केवारीची ठराविक रक्कम दिल्याशिवाय काम होत नाही.

वर्षानुवर्षांपासून तेच तेच अधिकारी व कर्मचारी हे काम करत असल्याने त्यांची मुजोरी वाढली आहे. (Zilla Parishad agents working at salary welfare fund team education black market nashik news)

वेतन व भविष्यनिर्वाह निधी पथकातील माध्यमिक विभागात वेतन, फरक बिल, मेडिकल बिल, शालार्थ नाव नोंदविणे, बोगस शालार्थ नाव नोंदविणे, पेन्शन रक्कम काढणे, तिसरा व चौथ्या वेतन आयोगाचा हप्ता काढणे, सातव्या वेतन आयोगाचा हप्ता रोखीने देणे, वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करणे, या कामांसाठी वेतन व भविष्यनिर्वाह निधी पथकाकडे शिक्षकांना जावे लागते.

मात्र येथे काम करताना एजंटच्या माध्यमातूनच जावे लागते. एजंटच्या माध्यमातून न जाता थेट अधीक्षकांना भेटल्यास काम होत नाही, अशी स्थिती आहे. १५ ते १६ वर्षांपासून कर्मचारी व अधिकारी या विभागात ठाण मांडून बसले आहेत.

या विभागाची सर्व अनियमित कामे स्वतःच्या मर्जीतील नेमलेले एजंट करतात. कोणाचे वेतन फरक बिल व मेडिकल बिल आधी काढायचे हे नेमलेले एजंट सुचविल्यानुसार काढले जातात. ज्याचा जास्त रेट त्याच व्यक्तीचे काम होते.

शिक्षण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी माझ्या ताब्यात आहेत. या आविर्भावात येथील अधिकारी वर्ग काम करताना दिसतो. मंत्रालय स्तरावरून येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाठिंबा असल्याने स्थानिक अधिकाऱ्यांना मूग गिळून काम करावे लागते, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ZP Education Black Market
NMC Promotion: सफाई कर्मचारी विकास युनियननेही थोपटले दंड! नि:पक्षपणे चौकशी न झाल्यास आंदोलनाचा ईशारा

वेतन व भविष्यनिर्वाह निधी पथक माध्यमिक विभाग नाशिक

वेतन फरक बिल

अधीक्षक : दहा टक्के
लिपिक : २५ हजार ते एक लाख रुपये.
एजंट : एक ते पाच टक्के
----------
मेडिकल बिल काढणे

अधीक्षक : दहा टक्के
लिपिक : १५ ते २५ हजार रुपये.
एजंट : एक ते तीन टक्के
-------------
शालार्थ नाव नोंदविणे

अधीक्षक : ५० हजार ते एक लाख रुपये
लिपिक : पाच ते पंधरा हजार रुपये
एजंट : दहा ते पंधरा हजार रुपये
------------
बोगस शालार्थ नाव नोंदविणे

अधीक्षक : दोन लाख रुपये
लिपिक : पाच हजार रुपये
एजंट : पाच ते पंचवीस हजार रुपये
-----------
पेन्शन रक्कम काढणे

अधीक्षक : दहा टक्के
लिपिक : पंचवीस हजार ते एक लाख रुपये
एजंट : पाच ते पंधरा हजार रुपये
-------------
तिसरा व चौथा वेतन आयोग हप्ता

अधीक्षक : दहा टक्के
लिपिक : १५ ते २५ हजार रुपये
एजंट : एक ते तीन टक्के
-------
सातवा वेतन आयोग रोखीने देणे

अधीक्षक : पाच ते पंधरा हजार रुपये.
लिपिक : पाच हजार रुपये.

एजंट : दोन ते पाच हजार रुपये.
--------
वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करणे

अधीक्षक : दहा टक्के.
लिपिक : १५ ते २५ हजार रुपये.
एजंट : एक ते तीन टक्के.
---------

ZP Education Black Market
ZP Education Black Market: जि. प. माध्यमिक शिक्षण विभागातील काहींचे दुकानदारीचे टेबल अन् Rate Cardचीही सोय!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()