ZP Shool Teacher Awards: जिल्हा परिषदेच्या 15 गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर; शनिवारी होणार वितरण

ZP Shool Teacher Awards
ZP Shool Teacher Awardsesakal
Updated on

ZP Shool Teacher Awards : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने कोणताही घोळ न घालता यंदा शिक्षकदिनीच गुणवंत शिक्षक पुरस्काराची घोषणा केली आहे.

जिल्ह्यातील १५ शिक्षकांना पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते शनिवारी (ता. ९) पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.

दुपारी बाराला गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी दिली. (Zilla Parishad announced 15 meritorious teacher awards Delivery will be on Saturday nashik)

जिल्हा परिषदेच्या वतीने दर वर्षी ५ सप्टेंबरला शिक्षक दिनानिमित्त जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर केले जातात. यंदा या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील १५ तालुक्यांतून एकूण २८ प्राथमिक शिक्षकांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते.

तालुका बदलून गटशिक्षणाधिकारी यांना प्रस्ताव पडताळणीसाठी देण्यात आले होते. गटशिक्षणाधिकारी यांनी प्रस्तावांची पडताळणी प्रत्यक्ष शाळांना भेटी देऊन पाहणी केली.

विहित पडताळणी प्रपत्र गुणांकनासह पडताळणी अहवाल गोपनीयरीत्या बंद लिफाप्यात जिल्हा कार्यालयास सादर केला होता. त्यानुसार जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक निवड समितीने गुणवत्तेच्या आधारावर प्रत्येक तालुक्यातून एका प्राथमिक शिक्षकाची निवड केली.

निवड केलेल्या १५ गुणवंत शिक्षकांचे प्रस्ताव मान्यतेसाठी विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठविण्यात आले होते. या प्रस्तावांना त्यांनी मान्यता दिली आहे. निवड झालेल्या सर्व गुणवंत शिक्षकांचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी अभिनंदन केले.

ZP Shool Teacher Awards
Teacher's Day: तुमच्या आवडत्या शिक्षकांना द्या हटके शुभेच्छा, पहा एकापेक्षा एक भारी मेसेज

गुणवंत शिक्षक असे

बागलाण : प्रमिला भावराव पगार, (प्रा. शिक्षिका) जिल्हा परिषद शाळा भिलदर, ता. बागलाण

चांदवड : वैशाली विलास जाधव, (प्रा. शिक्षिका) जिल्हा परिषद शाळा एकरुखे, ता. चांदवड

देवळा : अर्चना दादाजी आहेर, (प्रा. शिक्षिका) जिल्हा परिषद शाळा पिंपळेश्वर (वा), ता. देवळा

दिंडोरी : नौशाद अब्बास मुसलमान, (प्रा. शिक्षक) जिल्हा परिषद शाळा परमोरी, ता. दिंडोरी

कळवण : चित्रा धर्मा देवरे, (प्रा. शिक्षिका) जिल्हा परिषद शाळा अभोणा मुली, ता. कळवण

इगतपुरी : अनिल सारंगधर शिरसाठ, (प्रा. शिक्षक) जिल्हा परिषद शाळा, जामुंडे, ता. इगतपुरी

मालेगाव : प्रतिभा सुनील अहिरे, (प्रा. शिक्षका) जिल्हा परिषद शाळा, वजीरखेडे, ता. मालेगाव

निफाड : देवेंद्र वसंतराव वाघ, (प्रा. शिक्षक) जिल्हा परिषद शाळा, देवीचा माथा, ता. निफाड

नाशिक : उत्तम भिकन पवार, (प्रा. शिक्षक) जिल्हा परिषद शाळा, हनुमान वाडी, ता. नाशिक

नांदगाव : राजकुमार माणिकराव बोरसे (मुख्याध्यापक) जिल्हा परिषद शाळा, साकोरा, ता. नांदगाव

पेठ : रवींद्र सुभाष खंबाईत, (पदवीधर प्राथमिक शिक्षक) मोहपाडा, ता. पेठ

सिन्नर : संतोष बाळासाहेब झावरे, जिल्हा परिषद शाळा, आशापुरी (घोटेवाडी), ता. सिन्नर

सुरगाणा : परशराम पंडित पाडवी, (प्रा. शिक्षक) जिल्हा परिषद शाळा शिंदे (दि), ता. सुरगाणा

येवला : बालाजी बिभीषण नाईकवाडी, (प्रा. शिक्षक) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांडववाडी, ता. येवला

त्र्यंबकेश्वर : अर्चना ज्ञानदेव गाडगे, (प्रा. शिक्षिका) जिल्हा परिषद शाळा, हेदुलीपाडा, ता. त्र्यंबकेश्वर

ZP Shool Teacher Awards
Teachers Day : विद्यार्थ्यांना डिजिटल बाळकडू देणारा अवलिया! यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांची तंत्रस्नेही घडवणूक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.