Nashik News : चषक ZP अध्यक्षांचा कात्री मात्र शिक्षकांच्या खिशाला!

Wallet
Walletesakal
Updated on

दिंडोरी (जि. नाशिक) : दिंडोरी तालुक्यात दरवर्षीप्रमाणे जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा होत आहेत, मात्र या स्पर्धांना पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्यामुळे अधिकारी शिक्षकांकडून वर्गणी जमा करून स्पर्धा भरवत असल्याची तालुक्यात चर्चा आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शिक्षकांच्या खिशाला कात्री लागत असल्याने शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. (Zilla Parishad Presidents Cup Competition Officials organized by collecting subscriptions from teachers nashik news)

जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी १९९८ पासून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या नावे जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा घेण्यात येतात. यासाठी जिल्हा परिषद सेस फंडमधून खर्चाची तरतूद करण्यात येते. यात वैयक्तिक व समूह प्रकार असतात, त्यामुळे स्पर्धांना चांगला प्रतिसाद मिळतो.

शाळा स्तरावरून शिक्षकांनी विद्यार्थ्यांची त्या त्या स्पर्धा प्रकारात योग्य निवड करून त्यांना केंद्रस्तरावर शाळेच्या वतीने सहभाग घेण्यासाठी नेले जाते. यासाठी वाहतूक, वेशभूषा व इतर अनेक प्रकारचा खर्च शिक्षक व पालक स्वखर्चातून करतात. केंद्रस्तर तेथून बीट स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होता येते, त्यानंतर बीटस्तराहून तालुका स्पर्धांसाठी जाता येते. तालुकास्तरावर विजयी स्पर्धकांना जिल्हास्तरावर सहभागी होता येते.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

Wallet
Nashik News : आमदारांना जुनी पेन्शन मग कर्मचाऱ्यांना का नको? कर्मचारी संघटना आक्रमक

अशा प्रत्येक टप्प्यावर जिल्हा परिषदेकडून स्पर्धेसाठी वेगवेगळे अनुदान वितरित होत असते. काही वेळा पंचायत समितीही सेस फंडातून मदत देत असते. मात्र तरीदेखील प्रत्येक टप्प्यावर शिक्षकांकडून वर्गणी काढली जाते व त्यातून बक्षीसे, साऊंड सिस्टिम, मंडप इतर खर्च भागवला जात असल्याचे चित्र आहे.

दरवर्षी अधिकारी वर्ग शिक्षकांकडून प्रत्येक टप्यावरील स्पर्धांसाठी वर्गणीची अपेक्षा करून शिक्षकांवर अप्रत्यक्षरीत्या दबाव आणत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे प्रत्येक शिक्षकाला २५० ते ५०० रुपये वर्गणीचा खर्च येत आहे. जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीने वाढीव अनुदान उपलब्ध करून दिल्यास शिक्षकांना भुर्दंड पडणार नाही आणि स्पर्धाही व्यापक होतील. यासंदर्भात शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी लवकरच पालकमंत्री व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेणार आहेत.

Wallet
SAKAL Exclusive : RBIच्या डिजिटल रुपीमुळे लाखो लोक होणार बेरोजगार!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.