Nashik ZP News : जि. प. प्रशासनाची थेट शिक्षण प्रधान सचिवांकडे तक्रार

जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचा पदभार काढण्यावरून शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील आणि मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्यातील संघर्ष आता टोकाला गेला आहे.
ZP Nashik
ZP Nashik esakal
Updated on

Nashik ZP News : जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचा पदभार काढण्यावरून शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील आणि मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्यातील संघर्ष आता टोकाला गेला आहे.

शिक्षणाधिकारी पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाविरोधात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे तक्रार केली आहे.(ZP Administration direct complaint to Principal Secretary Education nashik news)

माध्यमिक विभागातील कामकाजात सूडबुद्धीने अडचण निर्माण करण्याच्यादृष्टीने परस्पर कार्यभार दिले असून बदल केले आहेत. त्यामुळे वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करताना अडथळे येत असल्याचे पाटील यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे. शिक्षणाधिकारी पाटील यांनी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव यांनी पत्र देत कार्यालयातील उपशिक्षणाधिकारी यांना जि.प. प्रशासनामार्फत परस्पर कार्यभार दिल्याबाबत तक्रार केली आहे.

नाशिक जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभाग कार्यालयात उपशिक्षणाधिकारी पदाची ४ पदे मंजूर असून त्यापैकी ३ पदे कार्यरत आहे. कार्यालयातील उपशिक्षणाधिकारी प्रकाश अहिरे यांना शिक्षणाधिकारी (योजना) जि. प. नाशिक या पदाचा पदभार दिला आहे. तसेच उपशिक्षणाधिकारी गणेश फुलसुंदर यांना (योजना) या पदाचा पदभार सोपविला आहे. सदर पदभार देताना या कार्यालयास अवगत केले गेलेले नाही.

या कार्यालयामार्फत कोणतीही मंजुरी न घेता जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने परस्पर सूडबुद्धीने माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या कामकाजात अडचण निर्माण करण्याच्या दृष्टीने सदर प्रकार केलेला आहे. सदर प्रकारामुळे माध्यमिक विभागात जि. प. नाशिकचे कामकाज प्रभावित झालेले असून वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यास अडथळे येत आहे.

ZP Nashik
Nashik ZP News : 3 महिन्यांत 187 कोटी खर्चाचे जिल्हा परिषदेसमोर आव्हान

त्यामुळे या कार्यालयामार्फत माहिती देण्यास दिरंगाई झाल्यास त्यास जि.प. प्रशासन सर्वस्वी जबाबदार असेल अशी तक्रार पत्रात केली आहे. या पत्रामुळे पाटील विरुद्ध प्रशासक असे चित्र निर्माण झाले आहे. मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या महत्वकांक्षी सुपर ५० योजनेत पाटील यांनी अपेक्षित सहकार्य केले नाही यावरून दोघांमध्ये वाद झाला.

त्यावर मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी पाटील यांच्याकडून या योजनेचे कामकाज काढून घेतले. दुसरीकडे मे महिन्यात पाटील यांच्या विरोधात थेट मंत्रालयात तक्रार करत त्यांची बदली करावी, असे पत्र दिले. या पत्रावर पाटील यांची तडकाफडकी बदली देखील झाली. मात्र, पाटील यांनी लागलीच मॅटकडे धाव घेत या बदलीला स्थगिती आणली.

त्यानंतर पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी लागलीच त्यांचा पदभार काढून घेतला. त्यावरून पाटील यांनी पत्रांचा खेळ मांडत, मॅटकडून पुन्हा पदभार मिळविला. आता प्रशासनाविरोधात तक्रार करत थेट मुख्यकार्यकारी अधिकारी यांनाच पाटील यांनी टार्गेट केल्याचे दिसत आहे.

ZP Nashik
Nashik ZP News: जि. प. माध्यमिकचे ते कामकाज ‘अवैध’!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.