Nashik News: ZP पशुसंवर्धनचा चारा लागवडीवर भर! चाराटंचाईवर मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग सरसावला

Fodder
Fodderesakal
Updated on

Nashik News : जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असल्याने पेरणी क्षेत्र घटले. त्यामुळे भविष्यात जिल्ह्यात चाराटंचाई होण्याची शक्यता आहे. यासाठी जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग आतापासून सरसावला.

विभागाकडून चारा लागवडीवर भर दिला जाणार असून, त्यासाठी पर्जन्यमान झालेल्या क्षेत्रात चारा लागवडीसाठी वैरण बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे.

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हे बियाणे घ्यावे, असे नियोजन करण्याच्या सूचना पशुधन अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. (ZP Animal Husbandry focuses on foddercultivation animal husbandry department stepped up to overcome fodder shortage Nashik News)

यंदा राज्यात मॉन्सूनचे आगमन वेळात होऊनही नाशिक जिल्ह्यात पावसाने दडी मारली. त्यामुळे सरासरीपेक्षा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अगदी कमी आहे. धरण क्षेत्रात पाऊस झाला असला, तरी इतर भागांत पुरेसा पाऊस झालेला नाही.

पाऊस नसल्याने खरीप हंगामात पेरण्या झालेली पिके वाया गेली आहेत. त्यामुळे भविष्यात चाराटंचाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने संभाव्य चाराटंचाईच्या नियोजनार्थ उपाययोजना करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने सुरवात केली आहे.

त्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी शिंदे यांनी जिल्ह्यातील पशुधन अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

यात प्रामुख्याने मुरघास तयार करणारे पशुपालक किती आहेत याची नोंद आपल्या स्तरावर अद्ययावत करून ठेवावी, चारा उपलब्ध असणारे पशुपालक किती आहेत याची संस्थानिहाय नोंद घ्यावी, तालुक्यात गोशाळा किती आहेत त्यांच्याकडे वैरणीसाठी किती क्षेत्र उपलब्ध आहे याचा सविस्तर आढावा घ्यावा.

जेणे करून सदर गोशाळांना वैरण बियाण्यांचा पुरवठा केल्यास त्यांच्या जमिनीवर चारा उपलब्ध करून घेता येईल, सिंचनाचे क्षेत्र जास्त असलेल्या तालुक्यांमध्ये उसाचे क्षेत्र किती आहे याची आपल्याकडे नोंद करून ठेवावी.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Fodder
NMC News: महापालिका आयुक्त बॅकफूटवर! वादग्रस्त आदेश रद्दची तयारी

जेणे करून भविष्यात चाराटंचाईची परिस्थिती उद्‍भवल्यास त्याचा वापर चाऱ्यासाठी करणे शक्य होईल, प्रत्येक गावात संयुक्त वन व्यवस्थापन समिती अस्तित्वात असून, त्यांच्याकडे उपलब्ध क्षेत्रावर किती चारा उपलब्ध होऊ शकतो याची माहिती घेण्यात यावी, आदिवासी तालुक्यात ज्या शेतकऱ्यांचे क्षेत्र वन विभागाच्या जमिनीलगत आहे व ते चारा साठवण करू शकतात अशांची नावे आपल्या स्तरावर एकत्र करून ठेवावीत, त्यामुळे या भागात पशुपालकांना वैरण बियाणे लावण्यासाठी प्रोत्साहित करणे शक्य होईल.

जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आपल्या क्षेत्रावर वैरण बियाणे लावण्यासाठी आपल्या स्तरावरून प्रोत्साहित करावे, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या आहेत. याशिवाय, संभाव्य चाराटंचाईच्या नियोजनार्थ उपाययोजना करण्यासाठी जास्तीत जास्त बियाणांची लागवड होणे आवश्यक आहे.

त्या अनुषंगाने वैरण बियाणे पेरण्यासाठी उत्सुक असलेल्या पशुपालकांच्या नावांच्या याद्या तत्काळ सादर कराव्यात, असे निर्देशही देण्यात आले आहेत.

Fodder
SAKAL Impact: ...अखेर सिव्हिलमधील ‘सिटी स्कॅन’ झाले सुरू! 2 महिन्यांनंतर कार्यान्वित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.