Nashik News : औद्योगिक वसाहतीतील गावांतर्गतचे प्रश्न सोडवू : ZP CEO आशिमा मित्तल

Speaking at the joint meeting, Chief Executive Officer Ashima Mittal, MADC Regional Officer Nitin Gawli, District Industry Center General Manager Sandeep Patil, Additional Chief Executive Officer Dr. Arjun Gunde.
Speaking at the joint meeting, Chief Executive Officer Ashima Mittal, MADC Regional Officer Nitin Gawli, District Industry Center General Manager Sandeep Patil, Additional Chief Executive Officer Dr. Arjun Gunde.esakal
Updated on

नाशिक : जिल्ह्यातील औद्योगिक वसाहती असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील रस्ते, पाणी, वीज, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन यांसह प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा परिषद प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले. याबाबत दर तीन महिन्यांनी बैठक घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. (ZP CEO Ashima Mittal orders solve problems within village in industrial estate Nashik News)

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या निर्देशानुसार आणि पालकमंत्री दादा भुसे व विकास आयुक्त उद्योग दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेतर्फे ग्रामीण भागात असलेल्या औद्योगिक संस्थांसंदर्भात औद्योगिक विकास महामंडळ, जिल्हा उद्योग केंद्र, औद्योगिक वसाहती असणाऱ्या ग्रामपंचायती व औद्योगिक संघटना यांची संयुक्त बैठक मंगळवारी (ता. २१) श्रीमती मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली नवीन सभागृहात झाली.

बैठकीत ग्रामपंचायत हद्दीतील औद्योगिक संस्था क्षेत्रातील रस्ते, पाणी, वीज, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन याच्यासह ग्रामपंचायत हद्दीतील औद्योगिक संस्थांच्या मिळकतींची करवसुली या संदर्भात चर्चा झाली.

जिल्हा परिषद क्षेत्रात नाशिक तालुक्यातील शिंदे, इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे, गोंदे, मालेगाव मधील अजंग, रावळगाव, दिंडोरी येथील पालखेड बंधारा, अक्राळे व तळेगाव दिंडोरी, येवल्यातील अंगणगाव व चिंचोडी खुर्द, निफाड तालुक्यातील सुभाषनगर, सिन्नर तालुक्यातील माळेगाव, मुसळगाव अशा १२ औद्योगिक संस्था क्षेत्रातील प्रश्नांबाबत औद्योगिक संस्थांचे पदाधिकारी सरपंच, ग्रामसेवक यांनी समस्या मांडल्या.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

Speaking at the joint meeting, Chief Executive Officer Ashima Mittal, MADC Regional Officer Nitin Gawli, District Industry Center General Manager Sandeep Patil, Additional Chief Executive Officer Dr. Arjun Gunde.
Agricultural Schemes : कृषी योजनांच्या अनुदानापोटी सव्वाबारा कोटींचे वाटप

बैठकीस महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत रवींद्र परदेशी, निमाचे धनंजय बेळे,

सिन्नर औद्योगिक सहकारी संस्थेचे नामकर्ण आवारे, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता जयवंत बोरसे, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, कार्यकारी अभियंता शैलजा नलावडे यांच्यासह ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते.

Speaking at the joint meeting, Chief Executive Officer Ashima Mittal, MADC Regional Officer Nitin Gawli, District Industry Center General Manager Sandeep Patil, Additional Chief Executive Officer Dr. Arjun Gunde.
State Level Kusti Spardha : धुळ्यात वाहतूक मार्गात बदल; जाणून घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.