सातपूर (जि. नाशिक) : नाशिक-जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात असणाऱ्या खासगी म्हणजे बिगर एमआयडीसी क्षेत्रातील उद्योजकांना भेडसावणारे रस्ते, पाणी आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यास आपण कटिबद्ध राहू, असे आश्वासन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले. (ZP CEO Ashima Mittal statement Committed to solving problems of entrepreneurs in rural areas nashik news)
अंबड इंडस्ट्रीज ॲन्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष निखिल पांचाळ, सरचिटणीस ललित बूब आणि सहसचिव योगिता आहेर यांनी जिल्हा परिषदेच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे स्वागत केले आणि नंतर त्यांच्याशी ग्रामीण भागातील म्हणजे बिगर एमआयडीसी क्षेत्रातील म्हणजे जानोरी, अक्राळे, वाडीवर्हे आदी ठिकाणच्या उद्योजकांच्या प्रश्नांबाबत चर्चा करून जिल्हा परिषदेशी निगडित असलेले त्यांचे प्रश्न सोडविण्याची गळ घालून मागण्यांचे निवेदन त्यांना सादर केले. जानेवारी महिन्यांत या संदर्भात संबंधित क्षेत्रांतील उद्योजकांचे प्रश्न जाणून घेतले जातील आणि ते सोडविण्याचा आपण प्रयत्न करू, असे आशिमा मित्तल यांनी या वेळी सांगितले.(Nashik News )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.