Nashik News: कामगिरीच्या आधारे मॉडेल स्कूलचे मूल्यांकन : ZP CEO आशिमा मित्तल

Chief Executive Officer Ashima Mittal speaking at the motivation meeting under Mission Model School of Zilla Parishad
Chief Executive Officer Ashima Mittal speaking at the motivation meeting under Mission Model School of Zilla Parishadesakal
Updated on

Nashik News : जिल्हा परिषदेच्या मिशन मॉडेल स्कूलमध्ये निवडण्यात आलेल्या सर्व शाळांचे कामगिरीच्या आधारे बाह्य संस्थेमार्फत मूल्यांकन (रेटिंग) करण्यात येणार आहे.

पहिल्या क्रमांकावर निवडण्यात आलेल्या शाळेला पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली. (ZP CEO Ashima Mittal statement Evaluation of model schools based on performance Nashik News)

जिल्हा परिषदेच्या मिशन मॉडेल स्कूल अंतर्गत कार्यप्रेरणा सभा शुक्रवारी (ता. २५) गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात घेण्यात आली.

सभेसाठी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, सर्व मॉडेल स्कूलचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सरपंच व शिक्षक उपस्थित होते.

पालकमंत्री दादा भुसे यांच्या प्रेरणेतून व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेने मिशन मॉडल स्कूल हा महत्त्वाकांक्षी उपक्रम जानेवारी २०२३ पासून हाती घेतला आहे.

या उपक्रमांतर्गत निवडक पाच शाळांचे सादरीकरण करण्यात आले. शिवडे, भेंडी नाचलादी, जाखोरी, भोयेगाव व खडक माळेगाव या शाळांचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांनी सादरीकरण केले.

तीन गटशिक्षणाधिकारी यांनी त्यांच्या तालुक्यातील मॉडल स्कूलमधील उपक्रमांविषयी माहिती दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Chief Executive Officer Ashima Mittal speaking at the motivation meeting under Mission Model School of Zilla Parishad
Nashik Onion Purchase: फेडरेशनतर्फे जिल्ह्यात कांदा खरेदी सुरू

या वेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. नितीन बच्छाव, ‘मविप्र’ समाज संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे उपस्थित होते.

या वेळी मित्तल म्हणाल्या, की सप्टेंबरमध्ये सर्व मॉडल स्कूलमध्ये सांस्कृतिक सप्ताह आयोजित केला जाणार आहे. उपजत गुणांना चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील. त्याचे वेळापत्रक शाळांना यापूर्वीच पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

तसेच, मविप्र समाज शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळांमधील कला, क्रीडा व संगीत शिक्षकांची आठवड्यातून किमान एक दिवस सेवा मॉडेल स्कूलसाठी देण्याची विनंती त्यांनी सरचिटणीस अॅड. ठाकरे यांना केली.

प्राथमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांनी प्रास्ताविक केले. विस्तार अधिकारी नीलेश पाटोळे यांनी सूत्रसंचालन केले.

Chief Executive Officer Ashima Mittal speaking at the motivation meeting under Mission Model School of Zilla Parishad
Nashik ZP News: जि. प. मुख्यालय इमारत दुरुस्तीचे कंत्राट रद्द : आशिमा मित्तल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.