Nashik News : ZP CEO मित्तल ‘फिल्ड’वर; सिन्नर तालुक्यात ग्रामपंचायत, आरोग्य केंद्रांना भेटी

Chief Executive Officer Ashima Mittal visited Aarogya Vardhini Kendra at Dapur in Sinnar taluka and interacted with the patients and staff here.
Chief Executive Officer Ashima Mittal visited Aarogya Vardhini Kendra at Dapur in Sinnar taluka and interacted with the patients and staff here.esakal
Updated on

Nashik News : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत सुरू असलेल्या जलजीवन मिशनच्या कामांवरून तसेच आरोग्य केंद्रात कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने लोकप्रतिनिधींकडून चहूबाजूने टीकास्त्र झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल सोमवारी (ता. २९) थेट फिल्डवर उतरल्या.

मित्तल यांनी सोमवारी सिन्नर तालुक्याचा दौरा करत येथील ग्रामपंचायती, आरोग्य केंद्र व पंचायत समितीला भेट देत आढावा घेतला. (ZP CEO Mittal on Field Visits to Gram Panchayat Health Centers in Sinnar Taluka Nashik News)

सोमवारी तालुकास्तरावर कर्मचाऱ्यांची अतंर्गत, प्रशासकीय व विनंती बदली प्रक्रिया पार पडली. यासाठी १५ तालुक्यांत मुख्यालयातील विभागप्रमुखांना निरीक्षक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी पाठविले होते.

या आदेशान्वये सर्व मुख्यालयांतील विभागप्रमुख तालुकास्तरावर निरीक्षक म्हणून सहभागी झाले होते. दुसरीकडे मित्तल यांनी सिन्नर तालुका दौरा करत भेटी दिल्या. मित्तल यांनी सिन्नर पंचायत समितीत जात, येथे आढावा बैठक घेतली.

या वेळी त्यांनी कामकाजाबाबत सूचना केल्या. त्यानंतर गोंदे ग्रामंपचायतींच्या ग्रामसेवकाबाबत तक्रारी असल्याने त्यांनी ग्रामपंचायतींस भेट दिल्याचे बोलले जात आहे. या वेळी त्यांनी ग्रामपंचायतींच्या कामकाजाचा आढावा घेतला.

दापूर येथील आरोग्यवर्धिनी केंद्रास भेट देत मित्तल यांनी पाहणी केली. वैद्यकीय अधिकारी शकंर पाटील उपस्थित होते. आरोग्य केंद्रातील स्वच्छतेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

भेटीदरम्यान, त्यांनी हजेरी घेतली असता आरोग्य केंद्रातील सर्व स्टाफही उपस्थित दिसून आला. या वेळी मित्तल यांनी प्रसूति झालेल्या महिलांच्या फिडींगबाबत सूचना केल्या.'

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Chief Executive Officer Ashima Mittal visited Aarogya Vardhini Kendra at Dapur in Sinnar taluka and interacted with the patients and staff here.
NMC Recruitment : राज्य शासनाने आवश्यक पदांचा जॉब चार्ट मागविला

मुख्यालयात अंतर्गत बदल्यांची लगीनघाई

मुख्यालयातील विभागप्रमुख हे तालुकास्तरावर निरीक्षण म्हणून गेलेले असल्याने विभागांमध्ये फारशी गर्दी नव्हती. मात्र, विभागांतर्गत कर्मचारी बदली करण्याचे आदेश दिलेले असल्याने सर्व माहिती अपडेट करण्याचे काम सुरू होते.

प्रत्येक विभागात अशा कर्मचाऱ्यांच्या याद्या तयार करून बदल्यांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंगळवारी (ता. ३०) मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांच्याकडे सादर केला जाणार असल्याचे समजते.

Chief Executive Officer Ashima Mittal visited Aarogya Vardhini Kendra at Dapur in Sinnar taluka and interacted with the patients and staff here.
NAAC: ‘नॅक’ प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 5 जूनची डेडलाइन; प्रक्रिया पूर्ण न केलेल्‍या महाविद्यालयांना सूचना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.