नाशिक : कोरोना संकटात जिल्हा परिषदेअंतर्गत कर्तव्य बजावत असताना अनेक कर्मचाऱ्यांच्या मृत्यू झाला. या कर्मचाऱ्यांना शासनातर्फे प्रत्येकी ५० लाखाचे विमा कवच देण्यात आले होते.
त्यानुषंगाने शासन निर्णयातील सर्व अटी आणि शर्तींची पूर्तता होत असलेल्या तीन कर्मचाऱ्यांच्या वारसांना विमा कवच/ सानुग्रह साहाय्य रक्कम एक कोटी पन्नास लाख रुपये जिल्हा परिषदेला शासनाकडून प्राप्त झाली. ती वारसांना देण्यात आली. (ZP Distribution of grant of one half crores to heirs of 3 deceased employees of Nashik News)
विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते पंचायत समिती दिंडोरी, येथील विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) दिनकर हिराजी खंबाईत यांचे वारसदार संगीता दिनकर खंबाईत, दिंडोरी येथील ग्रामविकास अधिकारी राधेश्याम तात्याराव खोपे यांचे वारसदार प्रमिला राधेश्याम खोपे, नगाव (ता. मालेगाव) येथील केंद्रचालक रवींद्र आत्माराम शेलार यांचे वारसदार कल्याणी रवींद्र शेलार यांना मंजूर अनुदानाची प्रत देण्यात आली.
मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी भालचंद्र चव्हाण, उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, वर्षा फडोळ आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.