Nashik ZP News : जि. प. अभियंता पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

जिल्हा परिषद अभियंता सहकारी पतसंस्थेची २०२३ ते २०२८ ही पंचवार्षिक निवडणूक गुरुवारी बिनविरोध पार पडली.
Former President Raosaheb Patil after the unopposed election of Zilla Parishad Engineer Co-operative Credit Institution was announced. Newly elected Board of Directors along with Raosaheb Baviskar.
Former President Raosaheb Patil after the unopposed election of Zilla Parishad Engineer Co-operative Credit Institution was announced. Newly elected Board of Directors along with Raosaheb Baviskar.esakal
Updated on

Nashik ZP News : जिल्हा परिषद अभियंता सहकारी पतसंस्थेची २०२३ ते २०२८ ही पंचवार्षिक निवडणूक गुरुवारी बिनविरोध पार पडली. संचालक मंडळाच्या ११ जागांसाठी ११ उमेदवारांचे अर्ज शिल्लक राहिल्याने निवडणूक अधिकारी शैलेश पोतदार यांनी ११ उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

यामुळे पतसंस्थेची बिनविरोधची परंपरा कायम राहिली. (ZP Election of Engineers Credit Union unopposed nashik news)

जिल्हा परिषदेतील अभियंत्यांची आर्थिक वाहिनी असलेल्या जिल्हा परिषद अभियंता सहकारी पतसंस्थेची व्यवस्थापक समितीच्या २०२३ ते २०२८ या कालावधीसाठीची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू होती. ११ जागांसाठी १७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.

त्यावर, जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे माजी अध्यक्ष रावसाहेब पाटील, रावसाहेब बाविस्कर, सचिव जितेंद्र पाटील, नितीन पाटील यांनी निवडणूक अर्ज दाखल उमेदवारांची बैठक घेतली. यात, पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध होत असल्याची परंपरा असल्याचे सांगत ही परंपरा कायम ठेवण्याचे आवाहन उमेदवारांना केले.

Former President Raosaheb Patil after the unopposed election of Zilla Parishad Engineer Co-operative Credit Institution was announced. Newly elected Board of Directors along with Raosaheb Baviskar.
Nashik ZP News : जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी; जि. प. ग्रामपंचायत विभागाचे आदेश

त्यानंतर, माघारीच्या अंतिम दिवशी दाखल झालेल्या १७ पैकी सहा उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे ११ जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात राहिले.

यात सर्वसाधारण गटातून सुरेश देशमुख, इग्नेशियस मकासरे, नामदेव भोये, अविनाश बुरकुले, देवेश बच्छाव, सचिन उगले, अनुसूचित जाती-जमाती गटातून सुभाष अहिरे, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून राहुल महाजन, विमुक्त जाती-जमाती प्रवर्गातून मुकेश गुंजाळ, महिला राखीव गटातून राखी देवरे, पूनम शिंदे यांचे अर्ज शिल्लक राहिल्याने निवडणूक अधिकारी पोतदार यांनी या उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. बिनविरोध निवड झाल्यावर अभियंत्यांनी जल्लोष साजरा केला.

Former President Raosaheb Patil after the unopposed election of Zilla Parishad Engineer Co-operative Credit Institution was announced. Newly elected Board of Directors along with Raosaheb Baviskar.
Nashik ZP News : जिल्हा परिषद लिपिकांच्या टंकलेखन प्रमाणपत्राची होणार पडताळणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.