जि. प. गट अन पं. स. गणांच्या 18 जुलैला प्रारुप मतदार याद्या

Panchayat Samiti & ZP Nashik
Panchayat Samiti & ZP Nashikesakal
Updated on

नाशिक : राज्यातील २५ जिल्हा परिषदा (ZP) आणि २८४ पंचायत समित्यांच्या (Panchayat Samiti) ओबीसी वगळून इतर आरक्षणाच्या कार्यक्रमापाठोपाठ आता राज्य निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचा (Voter list) कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्हा परिषदांच्या गट आणि पंचायत समित्यांच्या गणांच्या प्रारुप मतदार याद्या १८ जुलैला प्रसिद्ध केल्या जातील. (ZP Group Panchayat Samiti Draft voter lists for counties July 18 Nashik News)

Panchayat Samiti & ZP Nashik
सिन्नरच्या कांदा संशोधन केंद्रात खरीपासाठी बियाणे

प्रारुप मतदार याद्यांवर हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यासाठी २२ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. निवडणूक विभाग आणि निर्वाचक गणनिहाय अंतीम मतदार याद्या व अधिप्रमाणित करुन २९ जुलैला प्रसिद्ध होतील. मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या ८ ऑगस्टला प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका सप्टेंबर अथवा ऑक्टोंबरमध्ये होण्याची शक्यता अधिक आहे. दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व ३१ मे २०२२ ला अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार संघाच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी वापरण्यात येतील.

Panchayat Samiti & ZP Nashik
Nashik : आठवडे बाजारात मेथीची जुडी खातेय भाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.