Nashik News : जिल्हा परिषदेच्या बियाणे निरीक्षकांच्या तपासणीत परवाना न घेता कांदा बियाणे विक्री केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. (ZP raid in Dwarka area for sale of onion seeds without license Nashik News)
बियाणे निरीक्षक अभिजित जमधडे यांना द्वारका, मानकेक्षानगर येथे बेकायदेशीरीत्या कांदा बियाणे विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी पथकासह मे. अभिजित सीड्स प्रायव्हेट लिमिटेड दुकानाची तपासणी केली. रेड गॅलेक्सी, एन-५३ नाशिक रेड, एन-२-४-१, पुणा फुरसुंगी बियाण्यांचे ५०० ग्रॅमचे सीलबंद पाकीट दुकानात विक्री करताना आढळून आले.
दुकानदार योगेश कोठावदे (४२, रा. कळवण) यांची चौकशी केली. गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान येथे बियाण्यांचे पाकीट विक्री करत असल्याचे त्यांनी सांगितले. पथकाने पाकिटांचे निरीक्षण केले असता त्यावर राज्यात विक्रीची माहिती आढळून आली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
पावती बुकवरही बियाण्यांचे राज्यात विक्री केल्याचे निदर्शनास आले. सुमारे १३ लाखांचा बियाण्यांचा साठा बेकायदेशीर विक्री करत असल्याचे तपासणीतून स्पष्ट झाले. श्री. जमधडे यांनी वरिष्ठ अधिकारी विभागीय गुणवत्ता नियंत्रण व तंत्र अधिकारी नितेंद्र पानपाटील यांनी कारवाई करत संबंधित दुकानदाराविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या.
संबंधित बियाण्यांचा साठा अधिक तपासणीसाठी जप्त करण्यात आला आहे. त्यानुसार रात्री उशिरा भद्रकाली पोलिस ठाण्यात दुकानदार योगेश कोठावदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. इतक्या मोठ्या प्रमाणावर विनापरवाना बियाण्यांची विक्री होत असल्याने कर्मचाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.