ZP School Nutrition Scheme: साडेसहा लाख विद्यार्थी पोषण आहाराचे लाभार्थी

School Nutrition Scheme News
School Nutrition Scheme Newsesakal
Updated on

ZP School Nutrition Scheme : जिल्ह्यात १५ जूनपासून प्राथमिक शाळा सुरू झाल्या असून जिल्हा परिषदेच्यावतीने विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेंतर्गत पोषण आहार सुरू झाला आहे.

जिल्ह्यातील ४ हजार ४३१ शाळांमधील ६ लाख ५५ हजार २२६ विद्यार्थी हा पोषण आहार घेत आहे. २०, ४० व १०० टक्के अनुदानित सर्व शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजना लागू आहे. (ZP School Nutrition Scheme Six half lakh students beneficiaries of nutrition nashik)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

School Nutrition Scheme News
Nashik News: ZP इमारतीत लिकेज जैसे थे! प्राथमिक शिक्षण विभागात मोठया प्रमाणात पाण्याची गळती

इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांपैकी प्रत्येक विद्यार्थ्याला पोषण आहार देण्यासाठी जिल्हा परिषदेकडून ५ रुपये ४५ पैसे खर्च करण्यात येतात. तर इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांपैकी प्रत्येक विद्यार्थ्यावर ८ रुपये २७ पैसे खर्च करण्यात येतात.

पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ५ रुपये ४५ पैशांपैकी धान्यादी माल पुरविण्यासाठी ३.३७ रुपये तर इंधन आणि भाजीपाला खर्चासाठी २ रुपये ८ पैसे खर्च करण्यात येतात. आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ८ रुपये १७ पैशांपैकी ५ रुपये ६ पैसे धान्य व माल पुरविण्यासाठी तर इंधन आणि भाजीपाल्यासाठी ३.११ पैसे खर्च करण्यात येतात.

विद्यार्थ्यांना सकस आहार देणे हाच योजनेचा मुख्य हेतू असल्याने आठवड्यातून एकदा विद्यार्थ्यांना केळीवाटपही करण्यात येत असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांनी सांगितले.

School Nutrition Scheme News
Dhule ZP News : जि. प. शाळेची इमारत धोकादायक; एकाच वर्गात भरतात 3 इयत्तांचे वर्ग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.