ZP School Teacher Transfer : नाशिक जिल्हा परिषदेतील 6व्या टप्यातील शिक्षकांना न्यायालयीन दिलासा

Teacher Transfer
Teacher Transferesakal
Updated on

ZP School Teacher Transfer : नाशिक जिल्ह्यातील ६ व्या टप्यांत बदली झालेल्या २५३ शिक्षकांच्यावतीने दाखल याचिका (क्रमांक ५४०३/२०२३, ५४०५/२०२३) मध्ये ता१७ एप्रिल रोजी सुनावणी होऊन यात उच्च न्यायालयाने ७ जूनपर्यंत बदली प्रक्रियेला स्थगिती दिली आहे.

नव्याने २३ शिक्षकांसाठी २७ एप्रिल रोजी दाखल केलेली याचिका क्रमांक (स्टॅ.) १२२००/२०२३ वर सुनावणी अंती उच्च न्यायालयाने १७ जून पर्यंत स्थगिती दिली आहे.

मार्च २०२३ मध्ये झालेल्या शिक्षक बदली प्रक्रियेतील सहाव्या टप्यातील अवघड क्षेत्रात बदली झालेल्या अन्यायग्रस्त शिक्षकांना मुंबई उच्च न्यायालयाने बदली प्रक्रियेला स्थगिती देत बदली पीडित शिक्षकांना मोठा दिलासा दिला आहे. (ZP School Teacher Transfer Judicial relief to 6th phase teachers in Nashik Zilla Parishad nashik news)

नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या मार्च २०२३ मध्ये झालेल्या बदली प्रक्रियेतील सहाव्या टप्यामध्ये शेकडो शिक्षकांच्या सर्वाधिक महिला यांच्या अवघड भागात अन्यायकारक बदल्या झाल्या होत्या.

या अन्यायकारक बदल्या दुरुस्त कराव्यात यासंदर्भात बदली पीडित शिक्षक यांनी पालकमंत्री दादा भुसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, प्रशासनातील बदली गटाचे प्रमुख आयुष प्रसाद, ग्रामविकास विभागाचे उपसचिव प्रशांत पाटील, अधीक्षक, मुख्यकार्यकारी अधिकारी (नाशिक), आयुक्त (नाशिक) या सर्वांकडे या बाबत न्याय मिळावा म्हणून अर्ज विनंती केली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Teacher Transfer
Unseasonal Rain Crop Damage : कांदा भिजला तर बेदाणा फेकण्याची वेळ

परंतु कोणीही पालकमंत्री सोडून फारशी दखल घेतली नाही. त्यामुळे अखेर नाशिक जिल्हा संघाचे जिल्हाध्यक्ष. अर्जुन ताकाटे परिषदेचे रमेश गोईल, संघाचे धनराज वाणी, प्रशांत शेवाळे यांनी अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय मिळावा म्हणून मुंबई उच्च न्यायालयात वरील याचिका दाखल केल्या.

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी. एस. पटेल व न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाकडे सुनावणी होऊन बदलीप्रक्रियेस स्थगिती दिली आहे. त्यामुळे ज्या शिक्षकांची बदली अवघड व दुर्गम भागात झाली होती, त्या अन्यायग्रस्त शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणामध्ये शिक्षकांच्यावतीने ॲड. किशोर पाटील आणि ॲड. प्रदीप गोळे यांनी बाजू मांडली

Teacher Transfer
Unseasonal Rain Damage : बागलाण तालुक्याला अवकाळीने पुन्हा झोडपले; बळिराजा हवालदील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.