Nashik ZP : जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात सेल्फीद्वारे हजेरी प्रणालीची घोषणा केली होती. तब्बल पाच महिन्यांनंतर ही प्रणाली कार्यान्वित होण्यास मुहूर्त मिळाला आहे.
नाशिक तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर प्रणाली सुरू झाली असून, या चाचणीनंतर येत्या १ सप्टेंबरपासून जिल्हाभर ही प्रणाली लागू करण्याची तयारी आरोग्य विभागाने केली आहे. (ZP Selfie attendance at health centers in district Implementation started in Nashik Taluka)
ग्रामीण भागातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हजेरीचा मुद्दा मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या भेटीवेळी चांदोरी (ता. निफाड) येथे निदर्शनास आला.
बायोमेट्रिक मशिन असतानाही कर्मचारी हजर नसल्याने हजेरीसाठी मोबाईल सेल्फीद्वारे हजेरी मशिन बसविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यानुसार आरोग्य विभागाने नऊ लाखांची मागणी केली आहे.
जिल्ह्यातील ११२ प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील कर्मचाऱ्यांना ही हजेरी सक्तीची केली जाणार आहे. हजेरीसह फोटो अपडेशन, लाइव्ह लोकेशन आणि जिओ टॅगिंग या यंत्रणेचाही वापर केला जाणार आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यामुळे आरोग्य केंद्रातील कर्मचारी नेमका कुठे आहे, याबाबत यंत्रणेला तत्काळ समजणार आहे. नाशिक तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर ५१ अधिकारी व कर्मचाऱ्यांची सेल्फी हजेरी सुरू झाली आहे.
यातील अडचणींवर दुरुस्ती करण्यात येत आहे. ३१ ऑगस्टपर्यंत ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर, पहिल्या टप्प्यात काही तालुक्यांमध्ये ही प्रणाली कार्यान्वित करण्याचा आरोग्य विभाग प्रयत्न करत आहे.
यामुळे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आदी या कक्षेत येणार असून, कामाच्या वेळी बाहेर असणाऱ्या ग्रामीण भागातील आरोग्य कर्मचाऱ्यांना या प्रणालीमुळे आळा बसणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.