Nashik ZP News : जिल्हा परिषदेतील सर्व संवर्गातील प्रारूप सेवाज्येष्ठता यादी एक जानेवारीला प्रसिद्ध करण्याचे शासन आदेश आहेत.
या आदेशान्वये गतवर्षीप्रमाणे यंदाही जिल्हा परिषदेमधील ११ विभागातील ५५ संवर्गाच्या एक जानेवारी २०२४ रोजीची प्रारूप सेवाज्येष्ठता यादी मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल आदेशानुसार प्रसिद्ध करण्यात आली. (ZP Seniority list of all cadres released nashik news )
अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवा विषयक बाबी, पदोन्नती, मानीव दिनांक व आश्वासित प्रगती योजनेचे लाभ देण्याकरिता सेवाज्येष्ठता याद्या हा आधार मानला जातो. मागील वर्षी देखील एक जानेवारी२०२३ रोजीच सर्व संवर्गाच्या सेवाज्येष्ठता याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या.
त्यातील पदोन्नती, सेवानिवृत्ती, निधन, राजीनामा, स्वेच्छा सेवानिवृत्ती, सेवेतून बडतर्फ करणे, सेवेतून काढून टाकणे, सेवा संपुष्टात आणणे इ. कारणास्तव संबंधित अधिकारी व कर्मचारी यांची नावे नविन वर्षाच्या यादीत वगळण्यात येतात आणि मागील वर्षी सेवेत हजर झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांची नावे एक जानेवारीच्या यादीत समाविष्ट होतात.
याबाबत सर्व विभागप्रमुख यांनी सर्व सेवाज्येष्ठता याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. त्या याद्या जिल्हा परिषद मुख्यालयातील सर्व विभाग आणि पंचायत समित्या व त्याअंतर्गत सर्व कार्यालयामधील अधिकारी व कर्मचारी यांच्या निदर्शनास आणून देण्याबाबत निर्देशित करण्यात आलेले आहे.
या याद्या जिल्हा परिषदेच्या https://zpnashik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत, असे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी सांगितले. ज्या कर्मचाऱ्यांना याबाबत काही हरकती किंवा आक्षेप असतील तर त्यांनी प्रपत्र-ब मध्ये हरकत घेऊन व त्यानंतर कार्यालय प्रमुख यांनी प्रपत्र- क मध्ये जिल्हास्तरावर सादर करावयाची आहेत, असे परदेशी यांनी सांगितले.
विभागाचे नाव कंसात संवर्गाची संख्या
सामान्य प्रशासन विभाग ( ९), ग्रामपंचायत विभाग (३), बांधकाम विभाग (१३), अर्थ विभाग (४), आरोग्य विभाग (८), कृषी विभाग (१), लघुपाटबंधारे विभाग (२), पशुसंवर्धन विभाग (३), महिला व बालविकास विभाग (१), ग्रामीण पाणी पुरवठा (८), शिक्षण विभाग (३). एकूण (५५)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.