Nandurbar Crime News : नवापूरला वन विभागाने ट्रॅक्टरसह पकडला लाकूडसाठा

Timber stock held by the Forest Department.
Timber stock held by the Forest Department.esakal
Updated on

नवापूर (जि. नंदुरबार) : वन विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून मंगळवारी व बुधवारी पहाटे अवैध वाहतूक होणारा लाकूडसाठा पकडण्यात आला. मात्र नेहमीप्रमाणे अंधाराचा फायदा घेत लाकडाची तस्करी करणारे फरारी झाले. (Navapur forest department caught timber stock with tractor Nashik Latest Crime News)

करंजी खुर्द (ता. नवापूर) रस्त्याने वन विभाग २१ नोव्हेंबरला पहाटे पेट्रोलिंग करताना अज्ञात व्यक्ती मोटारसायकलने लाकडांची वाहतूक करताना दिसली. पाठलाग केला असता मोटारसायकल व साग चौपाट सोडून अंधाराचा फायदा घेत तो पसार झाला. मोटारसायकलीसह साग चौपाट सहा नग पकडले. सागवानी लाकडाचे सहा नग, मोटारसायकल (एमएच ३९, एच ४०२८) ऐवजाची बाजारभावानुसार अंदाजित किंमत ३० ते ३५ हजार एवढी आहे.

बोरझर (ता. नवापूर) रस्त्याने बुधवारी वन विभाग गस्त घालत असताना खळीबर्डी (ता. नवापूर) येथील अज्ञात व्यक्ती ट्रॅक्टरमध्ये इंजायली जळाऊ लाकडे भरून वाहतूक करताना दिसली. ट्रॅक्टरचा अटकाव केला असता ट्रॅक्टर थांबून अंधाराचा फायदा घेत पसार झाला.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

Timber stock held by the Forest Department.
MSRTC Android Machine : एसटीच्या अँड्रॉइड मशिनची प्रवाशांना प्रतीक्षाच

इंजायली जळाऊ मालासह ट्रॅक्टर (एमएच ३९, एन २००८, ट्रॉली एमएच ३९, ६८९८) पकडण्यात आला. जप्त माल व ट्रॅक्टर व ट्रॉलीसह मुद्देमालाची बाजारभावानुसार अंदाजित किंमत साडेचार लाख रुपये आहे.

या कारवाईत नवापूर वन परिक्षेत्र अधिकारी स्नेहल अवसरमल, खेकडा वनपाल भिवाजी दराडे, वनरक्षक संतोष गायकवाड, कमलेश वसावे, प्रशांत सोनार, ए. एम. शेख वनपाल बोरझर, वनरक्षक कल्पेश अहिरे, हिरालाल माळी, भूपेश तांबोळी, विकास शिंदे, वाहनचालक दिलीप गुरव यांनी सहभाग घेतला.

Timber stock held by the Forest Department.
MSRTC Android Machine : एसटीच्या अँड्रॉइड मशिनची प्रवाशांना प्रतीक्षाच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()