Navratri 2023 : येथील कुलस्वामिनी धनदाईदेवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. भाविकांनी देवीच्या जयघोष करीत सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती.
सकाळी धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आदिमायेस मानाचा ध्वज चढविण्यात आला.(Navratri festival of Dhandai Devi started dhule navratri news)
सायंकाळी घटस्थापना करण्यात आली. सकाळपासून मंदिराजवळ भाविकांची मांदियाळी वाढली आहे. आज पहिला दिवस असूनही दिवसभर भाविकांची मोठी गर्दी होती. सकाळी धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळाचे सचिव महेंद्र दौलतराव देवरे यांच्या हस्ते मानाच्या ध्वजाचे पूजन झाले.
मंडळाचे अध्यक्ष सुभाष गजमल देवरे, उपाध्यक्ष के. एन. देवरे, ज्येष्ठ संचालक यशवंतराव बळीराम देवरे, निरंजन गंगाराम देवरे आदींच्या हस्ते आदिमायेच्या मंदिरावर ध्वज चढविण्यात आला. डॉ. आबासाहेब वाणी, मच्छिंद्र खैरनार, किशोर खैरनार, राजेंद्र गवळी, भाविक, मंदिराचे कर्मचारी, सेवेकरी उपस्थित होते. देवीजवळ नवरात्रोत्सवात दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होतील.
चैत्र अष्टमीची यात्रा व नवरात्रोत्सवात दररोज लाखो भाविक देवीच्या चरणी नतमस्तक होतात. यंदा भाविकांना शिस्तीने दर्शन दिले जात आहे. देवी नवसाला पावते अशी भाविकांची श्रद्धा असल्याने पहाटेपासून भाविकांची पावले मंदिराकडे वळली आहेत. मंदिराच्या पायथ्याशी पूजेच्या साहित्याचे स्थानिक व्यावसायिकांनी दुकाने लावली आहेत.
सायंकाळी घटस्थापना!
सायंकाळी धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळाचे सचिव महेंद्र देवरे व सौ. सुवर्णा देवरे यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. अध्यक्ष सुभाष देवरे, उपाध्यक्ष काशिनाथ देवरे, ज्येष्ठ संचालक यशवंतराव देवरे, हिंमतराव देवरे, ज्येष्ठ पुरोहित चंद्रशेखर जोशी, प्रदीप जोशी, गणू महाराज दीक्षित उपस्थित होते. बाहेर गावाच्या भाविकांनी मंदिराजवळ घटस्थापना केली आहे. घटस्थापना करणारे भाविक दहा दिवस मुक्कामी असतील.
मंदिराजवळ सलग दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असेल. पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमीच्या दिवशी भाविक चक्रपूजा व आरती लावतात, त्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिरासह परिसरात विजेच्या दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे. काळगाव रस्ता, अमरावती नदीपात्र बसस्थानकावरील स्वागत दरवाज्यांवर देखील रोषणाई करण्यात आली आहे.
''धनदाईदेवी नवसाला पावते अशी भाविकांची श्रद्धा आहे. चैत्र शुद्ध अष्टमीचा यात्रोत्सव व नवरात्रोत्सवात भाविकांची सर्वाधिक गर्दी असते. वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळाने नियोजन केले आहे. भाविकांनी शिस्तीने दर्शन घेत नवसपूर्ती करावी.''- सुभाष गजमल देवरे, अध्यक्ष, धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळ, म्हसदी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.