Anil Gote NCP News : गटबाजीला कंटाळून ‘राष्ट्रवादी’तून बाहेर; माजी आमदार गोटे यांचे वक्तव्य

anil gote
anil goteesakal
Updated on

Anil Gote NCP News : गटा-तटाच्या राजकारणापायी भाजप पक्ष सोडला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही अंतर्गत गटबाजीला वैतागलो. चुगलखोरी करणे, खितपत पडणे यात मजा नव्हती.

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधून स्वखुशीने बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी बुधवारी (ता. ९) येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले. जनतेची कामे होण्यासाठी पुन्हा आमदार व्हावे लागेल, असे म्हणत त्यांनी अपक्ष उमेदवारीचेही संकेत दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार अनिल गोटे यांनी बुधवारी येथील गुलमोहर शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. (NCP Former MLA anil gote statement about ncp group exit dhule news )

तेजस गोटे, दिलीप साळुंखे, प्रशांत भदाणे, डॉ. अनिल पाटील आदी उपस्थित होते. श्री. गोटे म्हणाले, की राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कळविले असून, पक्षाध्यक्ष शरद पवार यांनाही प्रत पाठविली आहे.

भाजपमधील गटबाजी, गुंडांना खुलेआम समर्थन व संरक्षण तसेच प्रोत्साहन देण्याच्या मनोवृत्तीला कंटाळून आपण मुदतपूर्व विधानसभा सदस्यत्वाचा व पक्षाचा राजीनामा दिला होता. जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी चांगले व्यासपीठ मिळावे यासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, तेथेही दुर्दैवाने ते घडले नाही. आपल्याला गटातटाचे राजकारण कधी जमले नाही.

‘त्यांच्या’कडे रिकामा वेळ

राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही गटबाजी पाहायला मिळाली. जनतेचे प्रश्‍न सोडविण्याऐवजी भांडणात वेळ घालवला जातो, तक्रारी घेऊन येणारे लोक खाली काही करू शकत नाहीत, त्यांच्याकडे रिकामा वेळ आहे. स्वतः पैसे खर्च करून केवळ तक्रारी करायच्या, असले धंदे आपल्याला जमले नाहीत, जमणार नाहीत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

anil gote
Ajit Pawar News : पुणे-नाशिक रेल्वेमार्गाची अलाइनमेंट बदलण्याची शक्यता : अजित पवार

मतदारसंघातील लोकांच्या अपेक्षांची पूर्तता करायला वेळ पुरत नाही. त्यामुळे या भानगडी नकोत, असे वरिष्ठांना सांगितले, याबाबत चर्चा केली. मात्र, केवळ हो-हो म्हटले गेले. शेवटी राजीनामा पाठविला.

त्यानंतर पक्षाला आपली गरज नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आपले कुणाशीही वैयक्तिक भांडण, नाराजी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शहरातील पांझरा नदीकाठच्या रस्त्यांसाठी निधी मिळाला नसल्याची खंतही त्यांनी बोलून दाखविली.

अपक्ष उमेदवारीचे संकेत

जनतेच्या कामांसाठी आमदार व्हावे लागेल, असे म्हणत श्री. गोटे यांनी स्वतः स्थापन केलेल्या लोकसंग्राम पक्षाच्या माध्यमातून काम करण्याचे, अपक्ष उमेदवारीचे संकेत दिले. कुठल्या एखाद्या पक्षाची ऑफर आहे का, या प्रश्‍नावर श्री. गोटे यांनी नकार दिला. राजकीय पक्षाची आपल्याला गरज नाही. महाविकास आघाडीत जाणार का, या प्रश्‍नावरही त्यांनी निमंत्रण आले तर विचार करू, असे उत्तर दिले.

anil gote
Ajit Pawar Vs Sharad Pawar : धुळ्यात राष्ट्रवादी भवनाला दोन कुलपे; अजित पवार- शरद पवार गटाच्या समर्थकांमध्ये राडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.