Jayant Patil | विधानसभा निवडणूक मजबूत स्थितीत लढवू : जयंत पाटील

State President Jayant Patil while guiding in Shindkheda Assembly Elections
State President Jayant Patil while guiding in Shindkheda Assembly Electionsesakal
Updated on

निमगूळ (जि. धुळे) : मतभेद कमी करून प्रामाणिकपणे काम केल्यास यश मिळू शकते. एक वर्षाचा कालावधी आहे. (NCP state president Jayant Patil statement about assembly elections dhule news)

बूथ यंत्रणा मजबूत करण्यासाठी कटिबद्ध असले पाहिजे. प्रत्येक बूथवर यशदेखील मिळविणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक मजबूत स्थितीत व एका छताखाली लढवू, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील केले.

दोंडाईचा येथे शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाच्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक सौरभ मंगल कार्यालयात झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी माजी मंत्री एकनाथ खडसे, डॉ. हेमंतराव देशमुख, आमदार अनिल पाटील, संदीप बेडसे, निरीक्षक अर्जुन टिळे, संदीप बेडसे, रामकृष्ण पाटील, किरण शिंदे प्रमुख पाहुणे होते.

आमदार अनिल पाटील म्हणाले, की निवडणूक कुठलीही असो, सैन्याची आवश्यकता असते. मावळ्यांशिवाय लढता येत नसल्याचे सांगून आपल्या हक्काच्या लोकप्रतिनिधीसाठी मेहनत घेण्याचे आवाहन केले. अर्जुन टिळे म्हणाले, की मतभेद विसरून काम व्हावे. जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, बापू महाजन जुईताई देशमुख, पोपटराव सोनवणे, रामकृष्ण पाटील, एकनाथ भावसार यांनी मनोगत व्यक्त केले

हेही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

State President Jayant Patil while guiding in Shindkheda Assembly Elections
Dhule News : जि.प. पदाधिकारी, सदस्य लालपरीत; ‘महिला सन्मान’ योजनेच्या स्वागतासाठी बसमधून प्रवास

माजी मंत्री एकनाथ खडसे म्हणाले, की पदाधिकाऱ्यांना जबाबदारीचे पालन करावे लागेल. गावपातळीवर संघटना बूथ, युवक, महिला, अल्पसंख्याक, मागासवर्गीय, संघटन पोचले पाहिजे. एवढे पूर्ण झाले तर पाच हजार कार्यकर्त्यांची फौज तयार होईल. निवडणुका वाऱ्यावर जिंकता येत नाहीत. कार्यकर्त्यांची मेहनत सतत असली पाहिजे.

आपला त्रास कमी करण्यासाठी निवडणूक जिंकली पाहिजे. एकत्र राहिले तरच निवडणुकीत यश संपादन करता येईल म्हणून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आवाहन केले. डॉ. देशमुख म्हणाले, की आम्ही मतभेद विसरून एकत्र काम करणार असून, निवडणूक जिंकण्याचा निर्धार करत एकत्र येण्याचे आवाहनही केले.

माजी आमदार रामकृष्ण पाटील, कार्याध्यक्ष प्रशांत पाटील, किरण पाटील, किरण शिंदे, अमित पाटील, ॲड. एकनाथ भावसार, ललित वारुडे, मोतीलाल पाटील, ज्योती देवरे यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

State President Jayant Patil while guiding in Shindkheda Assembly Elections
Dhule Market Committee Election : 18 जागांसाठी 'या' तारखेला मतदान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.