Jalgaon News : जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी (ता.१३) स्थानिक गुन्हे शाखेची स्वतंत्र बैठक घेऊन कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. जिल्ह्यातील अनडिटेक्टर क्राईम आणि वाढती गुन्हेगारी यासह प्रत्येकाच्या स्वतंत्र कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षकांनी माहिती जाणून घेतली.
डॉ. रेड्डी यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून पदभार घेताच जिल्ह्यात खून, गोळीबार आणि दंगलीचे गुन्हे घडले. सोबतच चोऱ्या घरफोड्यांचे वाढते प्रमाण पाहता त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेची बैठक बोलावली होती. (New Superintendent of Police inquired individual performance including undetected rising crime in district jalgaon news)
पोलिस अधीक्षक कार्यालयातील प्रेरणा सभागृहात झालेल्या या बैठकीस अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशन पाटील यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या आस्थापनेवरील दुय्यम अधिकारी, महिला व पोलिस कर्मचारी बैठकीला उपस्थित होते.
पोलिस अधीक्षकांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या पारंपारिक गुन्ह्यांपासून तर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यापर्यंत संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेतला.
बैठकीत गेल्या कार्यकाळात उघड झालेले गुन्हे व त्यांचे प्रमाण, सध्या जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांत घडलेल्या मोठ्या घटना, त्यात चाळीसगाव गोळीबारप्रकरण, उपजिल्हाधिकाऱ्यांवर वाळू माफियांचा हल्ला दंगलीचे गुन्हे व अटक आरोपी याची माहिती घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. कर्मचाऱ्यांच्या कामाची पद्धत आणि तांत्रिक सपोर्ट याच्यावर भर देण्याच्या सूचनाही केल्या.
आयजींच्या उपस्थितीत क्राईम मीटिंग
नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे रात्री उशिरा जळगाव दाखल झाले असून त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील प्रभारी अधिकारी उपविभागीय अधिकारी यांची जिल्हास्तरीय गुन्हे आढावा बैठक होणार आहे.
ही बैठक दोन दिवसांपूर्वी झालेल्या दंगलीमुळे ऐनवेळी रद्द केली होती. आता ती आयजींच्या उपस्थितीत होत असून पोलिस अधीक्षक डॉ. रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते आणि पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या उपस्थितीत ही पहिलीच गुन्हे आढावा बैठक असून जिल्ह्याच्या वाढत्या गुन्हेगारीबाबत सांगोपांग चर्चा अपेक्षित आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.