Sakal Exclusive : आमलाड येथे उभारणार नवीन गुदाम; 3000 टन धान्य साठविण्याची क्षमता

new warehouse to be set up at aamalad will have storage capacity of 3000 tonnes of grain
new warehouse to be set up at aamalad will have storage capacity of 3000 tonnes of grain esakal
Updated on

Nandurbar News : तळोदा तालुक्यासाठी मंजूर असलेल्या नियतनाच्या तीनपट क्षमतेचे गुदाम आमलाड (ता. तळोदा) येथे उभारण्यास मंजुरी मिळाली असून, या ठिकाणी तीन हजार टन इतक्या क्षमतेचे गुदाम धान्य साठविण्यासाठी उभारण्यात येणार आहे. (new warehouse to be set up at aamalad will have storage capacity of 3000 tonnes of grain nandurbar news)

लवकरच गुदामाच्या बांधकामाला सुरवात होणार असून, भविष्यात यामुळे एकाच ठिकाणी सर्व धान्य साठविणे सोयीचे होणार आहे. दरम्यान, भविष्याचा विचार करून प्रशासनाने हे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे.

शासनातर्फे गरीब, गरजू नागरिकांची पोटाची खळगी भरण्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत गहू, तांदूळ व इतर धान्यांचे वाटप करण्यात येते. त्यात निकषानुसार प्रधानमंत्री गरीब कल्याणकारी अन्न योजना, प्राधान्य कुटुंब योजना व अंत्योदय अन्न योजनेंतर्गत आपापल्या गावातील स्वस्त धान्य दुकानात लाभार्थ्यांना धान्य देण्यात येते.

या सर्व धान्याची संबंधित तालुक्यात असलेल्या गुदामात साठवणूक करण्यात येते आणि आवश्यकतेनुसार तालुक्यातील रेशन दुकानांमध्ये ते धान्य पोचवून, लाभार्थ्यांना त्याचा लाभ देण्यात येतो.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

new warehouse to be set up at aamalad will have storage capacity of 3000 tonnes of grain
MGNREGA : नरेगा निधी खर्चात नाशिक जिल्हा अव्वल! विभागात नरेगा अंतर्गत गाठला 101 कोटींचा पल्ला

तळोदा तालुक्यात तीन ठिकाणी धान्य साठवणूक गुदामे आहेत. त्यात तहसील कार्यालयात ५०० टन क्षमतेचे व हातोडा रस्त्यावर ५०० टन क्षमतेचे धान्य साठवणूक गुदाम आहे. तसेच बोरद (ता. तळोदा) येथेदेखील एक गोदाम आहे. मात्र येथील गुदाम पाच महिन्यांपूर्वीच बंद करण्यात आले आहे.

भविष्याचा विचार करून शासनाने तालुक्यासाठी मंजूर नियतनाच्या तीनपट क्षमतेचे गुदाम बांधण्याचे ठरविले आहे आणि त्यानुसार तळोद्यात धान्य साठविण्यासाठी नवीन गुदाम तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी आमलाड (ता. तळोदा) येथील आदिवासी वसतिगृहाच्या शेजारी असलेली गट क्रमांक ५५/१ येथील ३.७९ हेक्टर आरपैकी १.५० हेक्टर आर जमीन यासाठी निवडण्यात आली आहे.

या ठिकाणी सुमारे तीन हजार टन इतक्या क्षमतेचे धान्य साठवून ठेवता येईल, असे गुदाम तयार करण्यात येणार आहे. तळोद्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी व तहसीलदार यांनी याबाबत चौकशी करून आमलाड येथील जागा गुदाम बांधकामासाठी देण्यास हरकत नसल्याचा अभिप्राय दिला आहे. त्यामुळे लवकरच नवीन सुसज्ज गुदाम तयार होण्याची चिन्हे दिसत आहेत.

new warehouse to be set up at aamalad will have storage capacity of 3000 tonnes of grain
Kidney Disease: सावधगिरीतून टाळा मूत्रपिंडाच्‍या व्‍याधी; उन्हाच्या तडाख्यात द्रवपदार्थांचे सेवन ठरते हितकारी!

जागा मोकळी होणार

येथील तहसील कार्यालयात धान्य साठविण्यासाठी एक गुदाम आहे. आमलाड येथे नवीन गुदाम झाल्यास त्याची जागा मोकळी होणार आहे. त्यामुळे हे गुदाम निवडणूक प्रशिक्षणकामी अथवा इतर महत्त्वपूर्ण शासकीय कामांसाठी उपयोगात येऊ शकणार आहे किंवा हे गुदाम पूर्णपणे मोकळे करून ही जागा इतर कामांसाठीदेखील उपयोगात येऊ शकते, असे सांगितले जात आहे.

तालुक्यात रेशनचे धान्य जिल्ह्याबाहेरील केंद्रावरून येते. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठा खर्च व वेळ लागतो. मोठ्या क्षमतेचे गुदाम झाल्यास तीन महिने किंवा अधिक काळासाठी धान्य साठविता येऊ शकणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना वेळेवर रेशन व्यवस्थेतील धान्य देणे शक्य होणार आहे.

"शासनाचा निर्देशानुसार तालुक्याच्या नियतनाच्या तीनपट क्षमतेचे नवीन गुदाम उभारण्यासाठी आमलाड येथील जागा निश्चित करण्यात आली आहे. या ठिकाणी लवकरच गुदामाच्या बांधकामास सुरवात होणार आहे. भविष्यात धान्य साठविण्यासाठी या गुदामाचा वापर करण्यात येईल." -गिरीश वखारे, तहसीलदार, तळोदा

new warehouse to be set up at aamalad will have storage capacity of 3000 tonnes of grain
Nandurbar News : थुवानी येथे आगीत घर भस्मसात; संसारोपयोगी साहित्य खाक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.