Nandurbar Chetak Festival : सारंगखेडा येथील चेतक फेस्टिव्हलमध्ये झालेल्या राष्ट्रीय अश्वचित्र शिल्प स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. त्यात जळगाव येथील निरंजन शेलार यांनी प्रथम क्रमांक मिळविला. त्यांनी ५१ हजारांचे पारितोषिक पटकाविले. (Niranjan Shelar first in National Equestrian Sculpture Competition Nandurbar Chetak Festival)
राष्ट्रीय अश्वचित्र स्पर्धेत आठ राज्यांतून एकूण ४५० चित्रांचा सहभाग होता. त्यापैकी अंतिम स्पर्धेसाठी व प्रदर्शनासाठी २५० चित्रांची निवड झाली. त्या चित्रांचे परीक्षण औरंगाबाद येथील प्रदीप कुमावत व शहादा येथील चतुर्भुज शिंदे यांनी केले.
८० बाय १५० फुटाच्या या प्रशस्त गॅलरीला पर्यटनमंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री अनिल पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांनीही भेट दिली. या वेळी मान्यवरांनी चित्रमूल्ये, चित्र कसे पाहावे-वाचावे, याबाबत मार्गदर्शन केले.
परिसरातील कलारसिकांना भारतातील विविध कलावंतांच्या कलाकृती पाहण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल चेतक फेस्टिव्हल कमिटीचेही त्यांनी आभार मानले. या चित्रप्रदर्शनामुळे भविष्यात अनेक कलावंत निर्माण होतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
चेतक फेस्टिव्हल हा अश्वकलेसोबत ललित कलांचा कलामहोत्सव असल्याचेही त्यांनी नमूद केले. स्पर्धेचे संपूर्ण नियोजन लंगडी (ता. शहादा) येथील आदर्श हायस्कूलचे कलाशिक्षक चतुर्भूज शिंदे यांनी पाहिले.
स्पर्धेतील विजेते असे
निरंजन शेलार (जळगाव, प्रथम, ५१ हजार पारितोषिक), रोहित पटेल (नाशिक, द्वितीय, ३१ हजार रुपये), शाहरुख पिंजारी (सारंगखेडा, तृतीय,२१ हजार रुपये), संतोष साळवे (असोदा, विशेष चित्र पुरस्कार, दहा हजार), प्रतीक रिशबड (मुंबई, विशेष शिल्प पुरस्कार, दहा हजार), भाविनी गोलवाला (गुजरात), राधिका वाघ (ठाणे).
योगेंद्र पाटील (रावेर), राज इंचलकर (कोल्हापूर), उन्नती पाटील (पाचोरा), विशाल निकम (धुळे), भटू बागले (मुंबई), अनिल कांबळे (कोल्हापूर), पूजा पाटील (पाचोरा), शिवाजी माळी (नंदूरबार, ज्युरी ॲवॉर्ड), श्याम कुमावत (नशिराबाद) व नीलेश शिंपी (पाचोरा, विशेष चेतक सन्मान ॲवॉर्ड). सर्व पारितोषिकप्राप्त विजेत्यांचे चेतक फेस्टिव्हलचे अध्यक्ष जयपालसिंहजी रावल यांनी अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.