Dhule News : या योजनांसाठी उत्पन्नाचा दाखला दरवर्षी देणे बंधन नाही!

no longer compulsory to give income certificate every year for govt schemes dhule news
no longer compulsory to give income certificate every year for govt schemes dhule newssakal
Updated on

Dhule News : संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेतील ५० वर्षे व त्यापुढील वयोगटातील लाभार्थ्यांना आता दिलासा आहे.

पाच वर्षांतून एकदाच उत्पन्न दाखला घेण्याचे निर्देश देण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले. (no longer compulsory to give income certificate every year for govt schemes dhule news)

शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी व पुढे सुरू राहण्यासाठी उत्पन्नाचा दाखला दर वर्षी देणे बंधनकारक आहे. मात्र अनेकांसाठी ही नसती डोकेदुखी ठरते. प्रामुख्याने ज्येष्ठ मंडळींना याचा खूप मनस्ताप होतो.

त्यामुळे शासनाचा आता नवा निर्णय आला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य खात्यातर्फे काही योजना राबविल्या जातात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

no longer compulsory to give income certificate every year for govt schemes dhule news
Dhule News : वृद्ध कलावंत मानधन योजनेसाठी या तारखेपासुन मुलाखती

त्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेतील ५० वर्षे व त्यापुढील वयोगटातील लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

लाभार्थ्यांना आता उत्पन्नाचा दाखला दर वर्षी देण्याची गरज नाही. या घटकांकडून असा उत्पन्न दाखला पाच वर्षांतून एकदाच घेण्याचे निर्देश खात्याने दिले आहेत. हा निर्णय ज्येष्ठ व वृद्ध लोकांची पायपीट थांबविण्यासाठी उपयुक्त ठरेल.

no longer compulsory to give income certificate every year for govt schemes dhule news
Dhule Rain Update : पिंपळनेर शहरात पावसाचे जोरदार आगमन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.