Dhule News : ‘एनआरएचएम’ कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरू; आरोग्यसेवेवर परिणाम

Employees of 'NRHM' protesting near Cumaine Club for various demands.
Employees of 'NRHM' protesting near Cumaine Club for various demands.esakal
Updated on

Dhule News : कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे बिनशर्त समायोजन करावे. तोपर्यंत समान काम-समान वेतन द्यावे या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनआरएचएम) येणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मंगळवार (ता. २१)पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

त्यानुसार क्युमाइन क्लबजवळ धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. आंदोलकांनी विविध मागण्यांसाठी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. (NRHM employees are on strike dhule news)

मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. या आंदोलनामुळे ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांमधील आरोग्यसेवेवर विपरीत परिणाम झाला आहे.

१,२५० कर्मचारी

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचारी नियुक्त आहेत. या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करावे या मागणीसाठी संबंधित सर्व अधिकारी, कर्मचारी, आरबीएसके तसेच समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेमार्फत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

Employees of 'NRHM' protesting near Cumaine Club for various demands.
Dhule News : सातपुड्यातील हजारो लोकांना ‘गजनी’ने बनविले शाकाहारी; अंगावरील कपड्यांद्वारे संदेश

या आंदोलनात जिल्ह्यातील कंत्राटी आरोग्यसेविका, सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधनिर्माण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत कार्यरत वैद्यकीय अधिकारी, डाटा एंट्री ऑपरेटर, लेखाधिकारी असे एक हजार २५० कर्मचारी सहभागी झाले आहेत.

शासनाच्या चुकीच्या धोरणांचा निषेध व्यक्त करत आंदोलकांनी मागण्या तत्काळ सोडविल्या गेल्या नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शासनासह प्रशासनाला दिला.

Employees of 'NRHM' protesting near Cumaine Club for various demands.
Dhule News : धार्मिक पर्यटनस्थळास 3 कोटी : अनुप अग्रवाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.