Dhule News : गावातील आजी-माजी सैनिकांना पुढील काळात घरपट्टी पूर्णपणे माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ग्रामसभेत न्याहळोद ग्रामपंचायतीने घेतला आहे.
धुळे तालुक्यातील न्याहळोद ग्रामपंचायतीची ग्रामसभा ३ मेस लोकनियुक्त सरपंच कविता वाघ यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत मंगल कार्यालयात झाली. (Nyahalod Gram Panchayat has decided to completely waive house rent to ex army man in future dhule news)
या वेळी ग्रामविकास अधिकारी प्रमोद पाटील, उपसरपंच नीलेश माळी, ग्रामपंचायत सदस्य रमेश चौधरी, इंदूबाई भिल, संतोष जिरे, माजी सरपंच कैलास पाटील, माजी उपसरपंच प्रकाश वाघ, तंटामुक्त अध्यक्ष भगवान बाविस्कर आदी उपस्थित होते.
ग्रामसभेत सर्वसंमतीने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यात गावात मोठ्या संख्येने आजी-माजी सैनिकांनी देशसेवा केली आहे. त्यांना यापुढील काळात घरपट्टी पूर्णपणे माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
त्याचबरोबर थकबाकीदार व नियमित घरपट्टी व नळपट्टी भरणाऱ्या ग्रामस्थांना २० टक्के सूट देण्यात येणार आहे, तसेच गावाला पाणीपुरवठा करण्याऱ्या सर्व विहिरींना सौरऊर्जा पंप बसविण्याचा निर्णय घेण्यात आला, तसेच अवैध वाळूउपसा बंद करण्यासाठी वाळू ठिय्या लिलाव बंद करण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
या वेळी ग्रामस्थांनी गावातील विविध भागाच्या समस्या मांडल्या. त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन ग्रामपंचायतीमार्फत देण्यात आले.
या वेळी ग्रामस्थ कैलास रोकडे, निंबा माळी, सचिन भावसार, संदीप जिरे, दत्तू नाना, दाजी वडार, अण्णा रावसाहेब, सचिन जिरे, सोमनाथ, देवा कोळी, दीपक जिरे, देवा पाटील, भय्या चौधरी, रामकृष्ण पाटील, सुरेश वाडिले, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका भामरे, जिल्हा परिषद मुलींच्या शाळेचे मुख्याध्यापक गणेश वाघ आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.