KBCNMU LLB News : एलएल.बी. प्रथम वर्षाच्या पेपर तपासणीवर आक्षेप; विद्यार्थ्यांनी मागितली इच्छामरणाची परवानगी

Bahinabai Chaudhari uttar Maharashtra University
Bahinabai Chaudhari uttar Maharashtra Universityesakal
Updated on

KBCNMU LLB News : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत एलएल.बी. प्रथम वर्षाच्या पेपर तपासणीत मोठ्या प्रमाणावर हलगर्जी झाली आहे.

उत्तरे लिहिलेली असताना गुण दिलेले नाहीत, असे आक्षेप विद्यार्थ्यांनी नोंदविले असल्याने विद्यार्थ्यांचे पेपर नव्याने ऑफलाइन पद्धतीने तपासून निकाल जाहीर करावा, अशी मागणी छात्रभारती संघटनेने केली आहे. (Objection to LLB first year paper examination by chhatra bharti dhule news)

ऑनलाइन पद्धतीने पेपर तपासणी करून विद्यापीठ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आयुष्य उद्‍ध्वस्त करत आहे. मागच्या वर्षीप्रमाणेच या वर्षीदेखील ६० टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा निकाल फेल लागला असून, हा सर्व पेपर तपासणीतील हलगर्जी व भोंगळ कारभार असल्याचे छात्रभारतीने म्हटले आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या पेपरची फोटोकॉपीदेखील मागविली असून, त्यात स्पष्टपणे विद्यापीठ व प्राध्यापकांची हलगर्जी दिसून येत आहे.

संबंधित विद्यार्थ्यांनी प्रश्नांची उत्तरे लिहिली असूनदेखील त्या उत्तराला गुण दिलेले नाहीत, तर दुसरीकडे दीर्घ उत्तराला एक व दोन गुण देण्यात आले आहेत. फोटोकॉपीमध्ये प्राध्यापकांनी पेपर तपासणीतील चूक निदर्शनास आणल्यानंतरसुद्धा विद्यापीठ अशा प्राध्यापकांवर कारवाई का करत नाही, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केल्याचे छात्रभारतीने म्हटले आहे.

मागण्या अशा

एलएल.बी. प्रथम वर्षाचे पेपर नव्याने प्राध्यापकांकडून ऑफलाइन पद्धतीने तपासणी करून नव्याने निकाल जाहीर करावा, एलएल.बी. प्रथम वर्षाच्या दुसऱ्या सत्रातील स्पेशल कॉन्ट्रॅक्ट या विषयाची प्रश्‍नपत्रिका विद्यापीठाच्या चुकीमुळे ८० गुणांची दिली गेली असून, विद्यार्थ्यांनी ८० गुण गृहीत धरून पेपर सोडविला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Bahinabai Chaudhari uttar Maharashtra University
Jalgaon KBCNMU News : महाविद्यालयात प्रत्येक विषयासाठी दोन प्राध्यापकांची नियुक्ती बंधनकारक

मात्र, निकालावेळी विद्यापीठाने १०० गुण धरून निकाल लावला. त्यामुळे या विषयात विद्यार्थ्यांना अतिरिक्त २० गुण देण्यात यावेत, अशी मागणी छात्रभारतीने केली आहे.

मनस्तापासह आर्थिक फटका

दरम्यान, वारंवार मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी नापास करण्यापेक्षा विद्यापीठाला नेमका कसा पेपर लिहिणे अपेक्षित आहे हे एकदाच जाहीर करावे, जेणेकरून विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या मनमानी कारभारामुळे मनस्ताप होणार नाही. चुकीच्या पद्धतीने गुणांकन करून परत पेपर फोटोकॉपी व रिड्रेसेलला टाकून विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसत आहे, मानसिक ताण देण्यात येत आहे.

या सर्व भोंगळ कारभारामुळे काही विद्यार्थ्यांनी इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. त्यामुळे संबंधित मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास विद्यापीठात आंदोलन करू, असा इशारा छात्रभारतीने दिल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकात दिला आहे.

Bahinabai Chaudhari uttar Maharashtra University
KBCNMU Award 2023 : यंदाचा बहिणाबाई पुरस्कार हेमचंद्र पाटील यांना; प्रयोगशील शेतीचा होणार गौरव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.