Dhule News : मनपा प्रशासनात ‘लॉबी’दार राजकारण! अधिकाऱ्यांकडून वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न...

Dhule Municipal Corporation
Dhule Municipal Corporationesakal
Updated on

Dhule News : येथील महापालिकेत सत्ताधारी भाजपचे निर्विवाद वर्चस्व असल्याने कोणताही निर्णय घेताना सत्ताधाऱ्यांना फारशा अडचणी येत नाहीत.

विरोधक नगण्य, त्यातही त्यांची बोटचेपी आणि पुचाट भूमिका असल्याने सत्ताधारी विरोधकांना जुमानत नसल्याचे पाहायला मिळते. (officers are not happy as lobby of officers tries to establish undisputed dominance in municipality dhule news)

महापालिकेतील विरोधकांसारखीच अवस्था प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचीदेखील झाल्याचे सध्या चित्र आहे. अधिकाऱ्यांची एक ‘लॉबी’ निर्विवाद वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याने इतर काही अधिकाऱ्यांमध्ये कमालीची नाराजी असल्याची महापालिकेत चर्चा आहे.

गेल्या काही महिन्यांपासून धुळे महापालिकेत अधिकाऱ्यांमध्ये वर्चस्ववादाची लढाई सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी अतिरिक्त आयुक्तांची बदली झाली. त्यामुळे हे चित्र आणखीनच ठळकपणे समोर येत असल्याचे दिसते.

अधिकाऱ्यांच्या बदल्या होणे ही प्रक्रिया तशी सामान्य आहे. महापालिकेतही ही प्रक्रिया नेहमीच पाहायला मिळते. अलीकडच्या काळात मात्र अधिकाऱ्यांच्या या बदल्यांमुळे प्रशासनातदेखील लॉबी तयार होत आहे की काय, अशी शंका यावी असे वातावरण महापालिकेत पाहायला मिळत आहे. महापालिकेतील विविध विभागांतदेखील अशी चर्चा ऐकायला मिळते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dhule Municipal Corporation
Dhule News : रात्री दहानंतर धुळे ‘बंद’ करा ; महापौर प्रतिभा चौधरी

फायलींचा उलटा प्रवास

अधिकाऱ्यांच्या वर्चस्ववादाच्या लढाईचा परिणाम म्हणून की काय महापालिका प्रशासनातील काही अधिकाऱ्यांकडील फायलींचा प्रवासदेखील उलटासुलटा झाल्याची माहिती आहे. एका अधिकाऱ्याकडून आपल्या वरिष्ठ पदाच्या अधिकाऱ्याकडे फाइल न पाठविता ती फाइल संबंधित अधिकारी थेट आयुक्तांकडे पाठवितो.

आयुक्तांना वाटले तर ती फाइल नंतर पुन्हा खालच्या संबंधित अधिकाऱ्याकडे जाते व नंतर पुन्हा ती आयुक्तांकडे येते असा हा फायलींचा उलटा प्रवासही महापालिकेत सुरू असल्याची चर्चा लपून राहिलेली नाही. या सर्व प्रकाराला अनेक कारणे आहेत. यामुळे महापालिकेत विशेषतः प्रशासनात सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र आहे.

उद्रेकाची शक्यता

कोणत्याही संस्थेत यंत्रणेतील वर्चस्ववादाच्या लढाईचे पर्यवसान उद्रेकात होते. महापालिकेचा कारभार सध्या सर्व काही व्यवस्थित आणि शांततेत सुरू असल्याचे दाखविले जात असले, काही लॉबीदार अधिकाऱ्यांना कुणाचे पाठबळ मिळत असले तरी नाराज असलेले, अन्याय झाल्याची भावना असलेल्या अधिकाऱ्यांकडून सर्व काही सहनच केले जाईल याची शाश्‍वती नाही. त्यामुळे उद्रेकाची शक्यता नाकारता येत नाही.

Dhule Municipal Corporation
Dhule News : माजी नगरसेविकेच्या घरावर दगडफेकप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()