Dhule Marathon 2024 : मॅरेथॉनच्या मार्गाची अधिकाऱ्यांकडून पाहणी

पोलिस कवायत मैदानावर रविवारी (ता. ४) पहाटे पाचपासून धुळे मॅरेथॉन २०२४ (सीझन २) स्पर्धा सुरू होणार आहे.
Officers of Police, Municipal Corporation, Zilla Parishad were present during the inspection of the marathon route.
Officers of Police, Municipal Corporation, Zilla Parishad were present during the inspection of the marathon route.esakal
Updated on

Dhule Marathon 2024 : येथील पोलिस कवायत मैदानावर रविवारी (ता. ४) पहाटे पाचपासून धुळे मॅरेथॉन २०२४ (सीझन २) स्पर्धा सुरू होणार आहे. तिच्या तयारीला आयोजकांनी वेग दिला आहे.

पोलिस मैदानावर सोमवारी (ता. २९) विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांसह स्पर्धेच्या अशासकीय सदस्यांची संयुक्त बैठक झाली. तीत पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी यंत्रणेला विविध सूचना दिल्या. (Officials inspect dhule marathon route news)

श्री. धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, मनपा उपायुक्त डॉ. संगीता नांदुरकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, पोलिस उपअधीक्षक हृषीकेश रेड्डी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश पाटील.

गृह शाखेचे पोलिस उपअधीक्षक धनंजय पाटील, ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक दत्तात्रेय शिंदे, शहराचे पोलिस निरीक्षक धीरज महाजन, वाहतूक नियंत्रक पोलिस अधिकारी भूषण कोते, पश्‍चिम देवपूर व देवपूरचे पोलिस निरीक्षक, स्पर्धेचे समन्वयक सहाय्यक पोलिस अधिकारी पंडित सोनवणे, तालुका आरोग्याधिकारी तरन्नुम पटेल.

आयोजन समितीचे सदस्य आशिष अजमेरा, आशिष पटवारी, संग्राम लिमये, दीपक अहिरे, डॉ. राहुल बच्छाव, निखिल सूर्यवंशी, पोलिस अधिकारी श्रीकांत पाटील आदी उपस्थित होते.

Officers of Police, Municipal Corporation, Zilla Parishad were present during the inspection of the marathon route.
Dhule News : कापडणे केंद्रशाळेत सेमी इंग्लिशसह पाचवीचाही वर्ग

पोलिस कवायत मैदानावर व्यासपीठ, तसेच टी-शर्ट, बीब, मेडल, नाश्‍ता वाटपाचे स्टॉल, बचतगट व इतर व्यावसायिक स्टॉल, सेल्फी पॉइंट आदींचे नियोजन व व्यवस्थेची पाहणी झाली.

नंतर पोलिस ग्राउंड, बारापत्थर चौकमार्गे शिवाजी महाराज पुतळ्याला वळसा घालून आग्रा रोडमार्गे पाचकंदील, गांधी पुतळा, मोठा पूल, दत्त मंदिर चौक, तेथून वळसा घालून जिल्हा क्रीडासंकुल, वलवाडी, भोकर, गोंदूर गावापर्यंतच्या मॅरेथॉन मार्गाची अधिकाऱ्यांनी पाहणी केली.

त्यात महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागास खड्डे दुरुस्ती, मोकाट जनावरांचा बंदोबस्त, मॅरेथॉन मार्गाची मनपा स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता यासह विविध प्रकारच्या उपयुक्त सूचना श्री. धिवरे यांनी दिल्या.

बचतगटांच्या स्टॉलची माहिती श्री. पवार, डॉ. नांदुरकर यांनी दिली. जिल्हा पोलिस दलाच्या पुढाकारासह महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि शैक्षणिक क्षेत्रातील अग्रेसर एसव्हीकेएम संस्था, रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉस रोड, माध्यम प्रयोजक ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या साथीने ही स्पर्धा होत आहे. त्यासाठी नोंदणी बंद झाली आहे.

Officers of Police, Municipal Corporation, Zilla Parishad were present during the inspection of the marathon route.
Dhule Marathon 2024 : ‘रन फॉर पांझरा’च्या माध्यमातून जनजागृती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.