Dhule News : ग्रामीण रुग्णालयासाठी एक कोटी; नागपूर अधिवेशनातून तरतूद

One crore funding for rural hospital of shindkheda dhule news
One crore funding for rural hospital of shindkheda dhule newsesakal
Updated on

Dhule News : नरडाणा (ता. शिंदखेडा) येथे सुमारे १४ कोटींच्या निधीतून तीस खाटांच्या ग्रामीण रुग्णालयास सार्वजनिक आरोग्य विभागाने २१ एप्रिलला प्रशासकीय मंजुरी दिली होती.

याकामी नागपूर हिवाळी अधिवेशनातील पुरवणी अर्थसंकल्पात एक कोटीच्या निधीची तरतूद झाली आहे.(One crore funding for rural hospital of shindkheda dhule news)

नरडाणा मुंबई-आग्रा महामार्ग, सुरत-भुसावळ पश्चिम रेल्वेमार्गावरील औद्योगिक वसाहत, बाजारपेठ, शैक्षणिक व आरोग्य सुविधा उपलब्ध असलेले गाव आहे. त्यामुळे रुग्णसंख्या जास्त असते. वाढत्या दळणवळणामुळे अपघातांचे प्रमाण जास्त आहे. तातडीची व अत्यावश्यक आरोग्यसेवा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णाला जिल्ह्याच्या ठिकाणी धुळे येथे यावे लागते.

ते गरीब व गरजू रुग्णांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यासाठी नरडाणा येथेच सुसज्ज व अत्यावश्यक सेवेच्या ग्रामीण रुग्णालयाची गरज आहे. त्यास मंजुरी मिळावी, अशी मागणी पाठपुराव्यासह जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती संजीवनी शिसोदे यांनी केली.

One crore funding for rural hospital of shindkheda dhule news
Dhule News: सोनगीरच्या दोन युवकांची ‘आयटीबीपी’मध्ये निवड

त्यासाठी त्यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत नरडाणा येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर व्हावे, नरडाणा आरोग्य केंद्राजवळील वर्षी येथे स्थलांतरित व्हावे, असा ठरावही मंजूर करून घेतला आहे.

मागणीनुसार हे काम मंजूर होण्यासाठी माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांनी विशेष प्रयत्न केले. या कामाला गती मिळावी यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार डॉ. सुभाष भामरे यांनीही विशेष सहकार्य केले, असे सभापती शिसोदे यांनी सांगितले.

One crore funding for rural hospital of shindkheda dhule news
Dhule News : वादानंतर निकम ‘कंट्रोल रूम’ला; प्रलंबित कसुरी अहवालाची दखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.