Nandurbar Crime : अवैध गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगणारा ताब्यात

Crime News
Crime Newsesakal
Updated on

Nandurbar Crime : अक्राळे (ता. नंदुरबार) येथील एकास अवैध गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

त्याच्याकडून लोखंडी पिस्तूल व चार काडतुसे हस्तगत करण्यात आली. (One was detained for possessing an illegal Gavthi made pistol nandurbar crime news)

जिल्ह्यात आगामी काळात साजऱ्या होणाऱ्या सण/उत्सवांच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून शांतता भंग करण्याच्या विचारात असणारे समाजकंटक व गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा या उद्देशाने नंदुरबार जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी अवैध अग्निशस्त्र व शस्त्र

बाळगणाऱ्यांची माहिती काढून त्यांच्यावर कठोर कायदेशीर करण्याबाबत सर्व पोलिस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना मासिक गुन्हे सूचना दिल्या होत्या.

जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांना रविवारी (ता. ११) माहिती मिळाली, की नंदुरबार तालुका पोलिस ठाणे हद्दीतील अक्राळे गावात राहणारा दिलीप चव्हाण याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल असून, तो ते कब्जात बाळगून फिरत असतो.

पोलिस अधीक्षक पाटील यांनी तत्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना कळवून माहितीची खात्री करून पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Crime News
Nandurbar Crime : रायपूरला दीड लाखांचा मद्यसाठा जप्त; नवापूर पोलिसांची कारवाई

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक खेडकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक अक्राळे येथे रवाना केले. पथकाने संशयित दिलीप चव्हाण यास घरून ताब्यात घेतले. त्याचे नाव दिलीप गोपा चव्हाण ( वय ५५, रा. अक्राळे, ता.जि. नंदुरबार) असे सांगितले.

ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीची झडती घेतली असता त्याच्या कब्जात ३५ हजार रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे लोखंडी पिस्तूल व चार हजार रुपये किमतीची चार जिवंत काडतुसे मिळून आल्याने त्यास गुन्ह्याच्या पुढील तपासकामी नंदुरबार तालुका पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर, हवालदार दीपक गोरे, पोलिस अंमलदार शोएब शेख, किरण मोरे, विजय ढिवरे यांनी केली आहे.

Crime News
Dhule Crime : हळदीच्या कार्यक्रमात नाचण्यावरून वाद; तरुणाला लाठ्याकाठ्यांनी मारहाण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.