Dhule Crime News : हॅण्डसम म्हणत प्रशंसेनंतर थेट धमकी; घोड्यामाळ येथील तरुणाची 'सोशल' प्रेमकथा

online scam woman scam person for money  dhule crime news
online scam woman scam person for money dhule crime newsesakal
Updated on

Dhule Crime News : सोशल मीडियावरील रिल्सची प्रशंसा करीत एका तरुणीने मोबाईल रिचार्जसह इतर खर्चाची मागणी केली. त्यानंतर तरुणीच्या आई-वडिलांसह भावाने दमदाटी करून पैशांची मागणी केली.

हा प्रकार लक्षात आल्याने घोड्यामाळ (ता. साक्री) येथील तरुणाने पिंपळनेर पोलिस ठाण्यात तरुणीसह संबंधितांविरुद्ध फिर्याद दिली. त्यावरून चौघांवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला. (online scam woman scam person for money dhule crime news)

यशवंत भिकन सोनवणे (वय २७, रा. घोड्यामाळ, ता. साक्री) याच्या फिर्यादीनुसार मार्च-२०२२ ते ८ जूनदरम्यान त्याची सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामवर हंसीका (२२) नामक तरुणीशी ओळख झाली. तरुणीने ‘आपका लूक बहोत अच्छा है, आप बहोत हॅण्डसम हो’ यासह इतर प्रशंसनीय संदेश पाठविले.

परिणामी, ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर हंसीकाने मोबाईल रिचार्ज व इतर खर्चासाठी पैशांची मागणी केली. मोबाईल रिचार्जसाठी एक हजार ७२० रुपये खर्च केले. .

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

online scam woman scam person for money  dhule crime news
Jalgaon Cyber Crime : सोशल मीडिया ॲक्टीव्ह असाल तर सावधान...! तुम्हीही ठरु शकता Sextortionचे सावज...

त्यानंतर तरुणीने वडील विश्वकर्मा रायचंद शर्माजी, आई रेणुका विश्वकर्मा शर्माजी व भाऊ अतुल विश्वकर्मा शर्माजी (सर्व रा. तेजादेवी विद्यामंदिरामागे, हरदेवनगर बर्रा, कानपूर, उत्तर प्रदेश) यांची ओळख करून दिली.

त्यामुळे विश्वास बसल्याने लग्नाला होकार असल्याची पक्की समजूत झाली. मात्र, त्यानंतर तरुणीने ‘तुझा माझा काहीच संबंध नाही, मला मेसेज अथवा कॉल करायचा नाही, मॅसेज केल्यास केस करेन’ अशी धमकी देण्यास सुरवात केली.

तसेच आई-वडील व भाऊ यांनीदेखील भ्रमणध्वनीवर वेळोवेळी पैशांची मागणी करून धमक्या दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून पिंपळनेर पोलिस ठाण्यात चौघा संशयितांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झाला

online scam woman scam person for money  dhule crime news
Nashik Cyber Crime: ‘वर्क फ्रॉम होम’ च्या नादात गमावले 18 लाख; सायबर गुन्हेगाराकडून महिलेची फसवणूक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.