Dhule Water Scarcity : दोंडाईचा परिसरात पावसाची दडी; अमरावती धरणातील साठ्याने गाठला तळ

Five percent of the remaining stock in Amravati Dam.
Five percent of the remaining stock in Amravati Dam. esakal
Updated on

Dhule Water Issue : परिसरात अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे कोरडवाहू शेतीतील पिके करपू लागली आहेत. दरम्यान, मालपूर (ता. शिंदखेडा) येथील अमरावती धरणातील साठ्याने तळ गाठला आहे.

जोरदार पावसाअभावी ५ टक्के साठा शिल्लक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. (only 5 percent water remaining in Amravati Dam dhule news)

शिंदखेडा तालुक्यात यंदा सुरवातीपासूनच जेमतेम पाऊस होत आहे. भिजपावसावरच शेतकऱ्यांनी कपाशीलागवड व पेरण्या करून टाकल्या. निम्मा पावसाळा संपला, दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटला, मात्र जोरदार पाऊस झाला नसल्याने शेतातून पाणी वाहून निघालेच नाही.

नदी, नाले, ओढे वाहिले नाहीत. जलयुक्त शिवाराचे बंधारे, साठवण बंधारे, धरणे कोरडी ठणठणीत पडली आहेत. बागायतदार शेतकऱ्यांच्या विहिरी उपशावर आल्या. मेमध्ये कपाशी लागवड केल्याने पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. पिकांची वाढ खुंटली, परिणामी उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पावसाअभावी बागायतदार शेतकऱ्यांची कांदालागवड रखडली आहे. सरासरीपेक्षा ही कमी पाऊस झाला आहे. सुमारे दोनशे मिलिमीटरही पाऊस यंदा झाला नसल्याचे आकडेवारीवरून समजते. वातावरणातील गारवा, आणि रिमझिम पाऊस यामुळेच पिके तग धरून आहेत. येत्या आठवडाभरात जोरदार पाऊस झाला नाही तर दुष्काळसदृश परिस्थितीचे चित्र निर्माण होऊ शकते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Five percent of the remaining stock in Amravati Dam.
Dhule Water Scarcity : जिल्ह्यातील प्रकल्पांत अवघा 23.68 टक्के साठा; पाणीटंचाईच्या झळा

आगामी दिवसांत पाऊस होईल की नाही यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती व्यक्त होत आहे. आवश्यक त्या प्रमाणात भांडवल उपलब्ध करून पेरणी, लागवड केली. आंतरमशागतीची कामे उघडिपीच्या काळात शेतकऱ्यांनी उरकून घेतली.

रोज आकाशाकडे टक लावून बघणारा शेतकरी मात्र हातबल झालेला दिसून येत आहे. जो दिवस येतो तो तसाच जातो, असे शेतकरी सांगतात. येत्या आठवडाभरात जोरदार पाऊस झाला नाही तर दुष्काळसदृश परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

‘अमरावती’साठी पावसाची प्रतीक्षा

मालपूर (ता. शिंदखेडा) येथील अमरावती धरणात किमान ५० टक्के साठा होण्यासाठी ग्रामस्थांना पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे गावातील पाणीटंचाई निर्माण होणार नाही.

Five percent of the remaining stock in Amravati Dam.
Nashik Water Scarcity : दिंडोरीतील धरणे अद्याप अतृप्तच; जोरदार पावसाअभावी जेमतेम साठा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.