Nandurbar News : राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत सहभागाची शिक्षकांना संधी; 28 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

teacher
teachersakal
Updated on

Nandurbar News : राज्यातील नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी यांची कल्पकता व सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, शिक्षकांसाठी ही सुवर्णसंधी असल्याने जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिक्षकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन नंदुरबार जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. जे. ओ. भटकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सतीश चौधरी यांनी केले आहे.(Opportunity for teachers to participate in state level innovation competition nandurbar news )

दर वर्षी राज्य शासनाच्या शिक्षण विभागातर्फे राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या वर्षीही राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा २०२३-२४ चे आयोजन पाच गटांमध्ये करण्यात आले आहे.

त्यात पहिला गट पूर्वप्राथमिक स्तरावरील अंगणवाडी कार्यकर्त्या/सेविका व पर्यवेक्षिका यांच्यासाठी, तर दुसरा गट प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक, तिसरा गट माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यासाठी, गट क्रमांक चार विषय सहाय्यक, विषय साधन व्यक्ती, समावेशित साधन व्यक्ती, विशेष शिक्षक व ग्रंथपाल आणि गट क्रमांक पाच अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी (केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी व अधिव्याख्याता व वरिष्ठ अधिव्याख्याता) अशा प्रकारे पाच गटांमध्ये स्पर्धा घेण्यात येणार आहे.

teacher
Nandurbar News : अश्वत्थामा यात्रेस प्रारंभ; भाविकांच्या संख्येत वाढ

स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नवोपक्रमशील अधिकारी शिक्षक/अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका या सर्व माध्यमातील स्पर्धकांनी आपले नवोपक्रम अहवाल मराठी अथवा इंग्रजी या भाषेमध्येच

https://scertmaha.ac.in/innovation/

या लिंकवर २८ नोव्हेंबर २०२३ ला रात्री बारापर्यंत सादर करावेत. स्पर्धेबाबतचे माहितीपत्रक या लिंकवर देण्यात आले आहे, त्याचे काळजीपूर्वक वाचन करावे. या स्पर्धेसंबंधित काही अडचणी अथवा शंका असल्यास जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, नंदुरबार येथील वरिष्ठ अधिव्याख्याता तथा विभागप्रमुख प्रवीण चव्हाण ७७४३८६४७०३, उपविभागप्रमुख तथा अधिव्याख्याता डॉ. वनमाला पवार (मो. ९४०५८७२८२३), विषय सहाय्यक देवेंद्र बोरसे (९१६८२३२२५६) यांच्याशी संपर्क साधावा.

teacher
Nandurbar News : जिल्ह्यातील 14 महसुली मंडळांत दुष्काळसदृश स्थिती जाहीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.