Dhule News : अखेर गव्हाणी घुबडांच्या पिल्लांना निसर्गात केले मुक्त

Shendwad (St. Sakri): Officials of the Wildlife Conservation Society and the Forest Department etc. while releasing the baby owls in the dense forest
Shendwad (St. Sakri): Officials of the Wildlife Conservation Society and the Forest Department etc. while releasing the baby owls in the dense forestesakal
Updated on

पिंपळनेर : येथील महाजननगरमध्ये २० डिसेंबर २०२२ ला वन विभाग व वन्यजीव संरक्षण संस्थेद्वारे पकडण्यात आलेल्या दोन गव्हाणी घुबडांच्या पिल्लांना अखेर दाट जंगलात निसर्गात मुक्त करण्यात आले.

पिंपळनेर येथील महाजननगर येथे २० डिसेंबरला दोन गव्हाणी घुबडांच्या पिल्लांना पकडण्यात आले. ही पिल्ले लहान असल्यामुळे ती उडण्याचा स्थितीत नव्हती.

यामुळे प्राण्यांकडून त्यांची शिकार होऊ शकते ही बाब लक्षात घेऊन वन विभाग पिंपळनेर यांनी पिल्ले पुढील संगोपनासाठी शहरातील वन्यजीव संरक्षण संस्था यांच्या ताब्यात दिली. (owls puppy make free in nature by help of Wildlife Conservation Society Dhule News)

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

Shendwad (St. Sakri): Officials of the Wildlife Conservation Society and the Forest Department etc. while releasing the baby owls in the dense forest
Nashik News: मुख्यमंत्रीसाहेब सातबाऱ्यावर नोंदी पैशांशिवाय होतच नाही! जिल्ह्यातून तक्रारींचा पाऊस

वन्यजीव संरक्षण संस्थेचे सदस्यांनी पिल्लांची उत्तम देखरेख करत त्यांनी पिल्लांचे संगोपन केले ती पिल्ले १५ दिवसांची झाल्याने उडण्यास पूर्णपणे सक्षम झाली म्हणून ४ जानेवारी २०२३ ला पिल्लांना वन विभाग पिंपळनेरचे पदाधिकारी व वन्यजीव संरक्षण संस्थेचे सदस्यांच्या उपस्थितीत शेंदवड (ता. साक्री) येथील दाट जंगलात सोडण्यात आले.

घुबडांना मुक्त करताच त्यांनी उंच भरारी घेत जंगलामध्ये मार्गक्रमण केले. या वेळी पिंपळनेर वन विभागाचे वनपाल संदीप मंडलिक, वनरक्षक अमोल पवार, वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, उपाध्यक्ष दानिश पटेल, स्वप्नील चौधरी, तेजस काकुस्ते आदी उपस्थित होते.

Shendwad (St. Sakri): Officials of the Wildlife Conservation Society and the Forest Department etc. while releasing the baby owls in the dense forest
Jalgaon News : 12 बाजार समित्यांच्या निवडणूकीचा मार्ग मोकळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.