Revenue Department News : महसूल विभागातर्फे पंचनाम्यांना सुरवात

Nimzari (T.Shirpur): Tehsildar Mahendra Mali inspecting the banana garden that was damaged by the storm
Nimzari (T.Shirpur): Tehsildar Mahendra Mali inspecting the banana garden that was damaged by the stormesakal
Updated on

Dhule News : तालुक्यात रविवारी (ता. ४) दुपारी वादळ आणि पावसामुळे झालेल्या हानीच्या पंचनाम्यांना महसूल विभागाने सुरवात केली असून, तहसीलदार महेंद्र माळी यांनी स्वत: आपत्तीग्रस्त भागांना भेट दिली.

वादळामुळे ८३ हेक्टरांवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

अचानक आलेले वादळ आणि पावसामुळे मालमत्तेसह पिकांना फटका बसला होता. विशेषत: केळी आणि पपईच्या बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

तहसीलदार माळी यांनी निर्देश दिल्यानंतर सोमवारी (ता. ५) महसूल विभागाचे मंडळ अधिकारी, तलाठी यांनी पंचनाम्यांना सुरवात केली. (Panchnama started by revenue department Estimated loss of crops on 83 hectares in Shirpur taluka Dhule News )

वादळामुळे अजनाड गावातील चार, थाळनेर, भाटपुरा, जळोद येथे प्रत्येकी एक, तऱ्हाडी येथे दोन, भोईटी, बोराडी, कोडीद येथे प्रत्येकी एक, शिंगावे येथे दोन, भोरखेडा येथे दोन घरांचे नुकसान झाले.

वादळामुळे तालुक्यातील निमझरी, दहिवद, भामपूर, भावेर, भोरखेडा, असली, गोदी, उपरपिंड, खर्दे बुद्रुक, लोंढरे, टेंभे बुद्रुक, भरवाडे, वाघाडी, अर्थे, करवंद, बोराडह, नटवाडे, होळनांथे, शिरपूर शिवार, उंटावद, जातोडे, वाडी, साकवद भागात केळीबागांचे नुकसान झाले आहे. टेंभे बुद्रुक व भरवाडे भागात पपईबागेचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nimzari (T.Shirpur): Tehsildar Mahendra Mali inspecting the banana garden that was damaged by the storm
Dhule Crime News : चिथावणी दिल्या प्रकरणी उपसरपंचासह 30 जणांवर गुन्हा

प्राथमिक पंचनाम्यात तालुक्यातील ९६ शेतकऱ्यांची ७९.९० हेक्टरावरील केळी व सहा शेतकऱ्यांची चार हेक्टरावरील पपई अशा एकूण ८३.९० हेक्टरावरील नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.

हे नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचेही पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे. स्वत: तहसीलदार महेंद्र माळी यांनी सहकाऱ्यांसह निमझरी परिसरातील केळी बागांची पाहणी केली.

Nimzari (T.Shirpur): Tehsildar Mahendra Mali inspecting the banana garden that was damaged by the storm
NMC News: होर्डिंगवर जिओ टॅगिंग लावण्याचा निर्णय; 150 होर्डिंगधारकांकडून स्टॅबिलिटी सर्टिफिकेट सादर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.