नाशिक : हैदराबादला गेल्याच आठवड्यात पशुवैद्यकीय डॉक्टरवर लैंगिक अत्याचार करून निर्घृणपणे जाळण्याच्या धक्कादायक प्रकाराने देशभरात संतापाची लाट उसळी असताना, उन्नावच्या अल्पवयीन पीडितेचीही जाळून हत्या करण्यात आली. नाशिकमध्येही अवघ्या सातवर्षीय चिमुकलीवर अत्याचाराची घटना समोर आली. त्यामुळे देशभरातील शहरे महिलांसाठी सुरक्षित आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नाशिक जिल्ह्यात 2019 मध्ये 2018 च्या तुलनेत लैंगिक अत्याचाराच्या विविध घटनांत घट झालेली असली, तरी महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास नाशिकही महिलांसाठी असुरक्षित होत आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. नाशिक शहरात गेल्या 23 महिन्यांत महिला अत्याचाराच्या तब्बल 583 घटना घडल्या आहेत. विशेषत: बाललैगिंक अत्याचाराचे 161 गुन्हे दाखल झाले असून, ही बाब चिंताजनक आहे.
पावणेसहाशे महिला "शिकार', बाललैंगिक अत्याचारातील चिमुकल्या पीडित तर दिडशे
हैदराबाद आणि उन्नाव येथील घटनांनी पुन्हा देशभरातील महिलांच्या सुरक्षिततेचा विषय ऐरणीवर आला आहे. एकीकडे महिला उच्चशिक्षित होत असताना समाजातीलच वासनांध नराधमांकडून महिलांची "शिकार' केली जात आहे. नाशिक शहर पोलिस आयुक्तालय हद्दीत गेल्या वर्षभरात कौटुंबिक हिंसाचारापासून ते बाललैंगिक अत्याचाराच्या घटनांत तब्बल 583 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. 23 महिन्यांमध्ये एक हजार 296 गुन्हे नोंदविले गेले आहेत. यात प्रामुख्याने चिंतेची बाब बाललैंगिक अत्याचाराची आहे. 2018 मध्ये बाललैंगिक अत्याचाराच्या 94, तर 2019 मध्ये 67 गुन्हे दाखल झाले आहेत. यावरून चिमुकल्या कळ्याही वासनांध नराधमाच्या शिकार होत आहेत. पोलिस प्रशासनाकडून महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात सातत्याने उपाययोजना राबविल्या जात असतानाही वाढत्या घटना या चिंतेची बाब ठरत आहेत.
वर्ष विनयभंग बलात्कार पॉक्सो (बाललैंगिक अत्याचार कायदा)
2018 | 2019 | (नोव्हेंबरअखेर) |
177 | 54 | 94 |
53 | 38 | 67 |
एकूण 330 | 92 | 161 |
शहर पोलिसांच्या उपाययोजना कौटुंबिक हिंसाचारातही वाढ
विवाहितांच्या संरक्षणासाठी कठोर कायदे अमलात आणल्यानंतरही कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. गेल्या अकरा महिन्यांत 184 विवाहितांच्या छळप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. यात एकीचा बळीही गेला आहे. 17 विवाहितांना कौटुंबिक छळातून आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी संशयितांविरोधात गुन्हेही दाखल आहेत.
संकटकालीन परिस्थितीत महिलांना किऑक्समुळे पोलिसांची मदत
नाशिक शहर पोलिसांकडून महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात स्वतंत्र निर्भया पथक तयार करण्यात आले आहे. गर्दीच्या ठिकाणी, झोपडपट्टी, उद्याने, महाविद्यालय, शाळांत जनजागृती केली जात असतानाच टवाळखोरांविरोधात कारवाई केली जाते. कौटुंबिक हिंसाचाराने त्रस्त विवाहितांच्या मदतीसाठी स्वतंत्र महिला स्कॉडही आहे. याशिवाय महिलांच्या समुपदेशनासाठी स्वतंत्र कक्ष महिला सुरक्षा विभागात आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यात स्वतंत्र महिला तक्रार निवारण कक्षही आहे. येत्या काळात शहरात ठिकठिकाणी किऑक्स मशिनही बसविले जाणार असून, त्यामुळे संकटकालीन परिस्थितीत महिलांना या किऑक्समुळे पोलिसांची मदत तत्काळ उपलब्ध होऊ शकणार आहे. महिलांसाठीच्या पथकांत पोलिस निरीक्षक दर्जाच्या महिला पोलिस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नियंत्रण कक्षातही स्वतंत्र हेल्पलाइनही आहे. याशिवाय या पथकांकडून महिलांना सहज संपर्क करता यावा यासाठी मोबाईल व व्हॉट्सऍप क्रमांकही देण्यात आले आहेत.
महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात विशेष पथक
पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात विशेष पथक नेमण्यात आले आहे. पोलिस ठाण्यातही महिलांशी संबंधित तक्रार असेल तर तत्काळ त्यावर कारवाईचे आदेश आहेत. त्याची दखल घेऊन महिलेच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले आहे. महिला पोलिस अधिकाऱ्यांकडेच महिला सुरक्षिततेसंदर्भातील पथकांची जबाबदारी सोपविण्यात आल्याने महिला व पोलिस यांच्यात सुसंवाद वाढला आहे. त्यामुळे अनेक घटनांना अटकाव करण्यात पोलिसांना यश आले. - लक्ष्मीकांत पाटील, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा, नाशिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.