Dhule News : बिल ऑनलाइन भरा; तक्रार निवारणासाठी फिरा

Mahavitran
Mahavitranesakal
Updated on

Dhule News : ऑनलाइन पद्धतीने वीजबिल अदा करूनही काही वीजग्राहकांना चालू बिलात थकबाकी आल्याने संबंधित वीजग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

विशेष म्हणजे याबाबतची तक्रार घेऊन गेलेल्या संबंधित ग्राहकांना आता वीज कंपनीच्या एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. चकरा मारूनही त्यांच्या समस्येचे निराकरण होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे संबंधित वीज ग्राहकांच्या मनस्तापात भरच पडली आहे. (Pay bill online Go for Grievance Redressal Administration of electricity company Customers suffer due to arrears even after paying bill Dhule News)

ऑनलाइनच्या जमान्यात आर्थिक व्यवहारही ऑनलाइन झाल्याने ग्राहकांसह संबंधित संस्था, आस्थापनांचाही वेळ, श्रम वाचण्यास मदत झाली आहे. वीज कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी वीजबिलाचा भरणा करण्यासाठी विविध ऑनलाइन सुविधा उपलब्ध केल्या आहेत.

या सुविधांचा अनेक ग्राहकांकडून वापर होतो. परिणामी विविध केंद्रांवर वीजबिल भरण्यासाठी लागणाऱ्या रांगा कमी होण्यास मदत झाली, यंत्रणेवरचा ताणही त्यामुळे कमी झाला आहे. मात्र, तक्रार निवारणात वीज कंपनीची यंत्रणा अद्यापही गतिमान झाल्याचे दिसत नाही. परिणामी वीजग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Mahavitran
Akola News : पूर्ण होण्यापूर्वीच सांस्कृतिक भवनाला तडे; मनसेची उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

बिल भरूनही थकीत

एप्रिल-२०२३ चे वीजबिल ऑनलाइन भरल्यानंतरही मेच्या बिलात ते थकीत म्हणून आले. त्यामुळे संबंधित ग्राहक चिंतेत पडले. यातील काही ग्राहकांनी थेट संबंधित वीज कंपनीचे ऑफीस गाठत याबाबत विचारणा केली.

मात्र, संबंधित कार्यालयांकडून वीजबिलाच्या तक्रारींचे काम बिलिंग विभाग पाहतो. हे कार्यालय धुळे शहरातील पारोळा रोड भागात असल्याचेही तक्रारदारांना सांगण्यात आले. त्यामुळे काही ग्राहकांनी पारोळा रोडवरील कार्यालयात धाव घेतली. मात्र, तेथेही लगेच त्यांना दिलासा मिळत नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.

Mahavitran
Solapur News : भैय्या चौकातील धोकायदायक रेल्वे पुलावरून बिनधास्त जडवाहतूक

ई-मेलला प्रतिसाद नाही

ग्राहकांच्या बिलांच्या तक्रारीबाबत धुळ्यातील बिलिंग कार्यालयाकडून आपल्या वरिष्ठांना मेल करण्यात आला. मात्र, एका मेलवर वरिष्ठ पातळीवरून प्रतिसाद मिळाला नाही म्हणून कार्यालयाकडून रिमाईंडर मेल करण्यात आले.

त्यानंतरही प्रतिसाद मिळालेला नाही. ग्राहकांनी वरिष्ठांशी संपर्कासाठी फोन नंबर देण्याची मागणी केली मात्र, फोन नंबर नाहीत. ई- मेलशिवाय दुसरा पर्याय नसल्याचेही कार्यालयाकडून सांगण्यात आले. त्यामुळे आम्ही करायचे काय असा सवाल तक्रारदारांनी उपस्थित केला आहे.

दंडाचा भुर्दंड

चालू बिल अदा करण्यासाठी मंगळवारी (ता.२७) शेवटची मुदत असताना तक्रारीचे निरसन होत नसल्याने बिल भरण्यातही अडचणी येत असल्याचे तक्रारदार ग्राहकांनी सांगितले. आता मुदतीत बिल भरले नाही तर पुन्हा दंडाचा भुर्दंड आम्हाला सहन करावा लागेल, असे तक्रारदार ग्राहकांचे म्हणणे आहे.

Mahavitran
Dhule News : ...अन्यथा मनपा आवारात अंत्यसंस्कार; वलवाडी स्मशानभूमीच्या दुरवस्थेचा प्रश्‍न

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()