जळगाव : महापालिकेच्या (Municipal Corporation) अतिक्रमण विभागातर्फे शहरातील जप्त केलेल्या टपऱ्या तसेच फ्लेक्स सतरा मजली इमारतीच्या आवारातच ठेवण्यात आले आहेत. त्या ठिकाणी असलेले पत्रे आणि फ्लेक्स वाऱ्यामुळे उडत असून लोकांना लागण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. त्यामुळे महापालिका आपल्या आवारातील हे भंगार हटविणार काय? हाच प्रश्न आहे.
महापालिकेतर्फे शहरातील अतिक्रमणांवर तसेच बेकायदा फ्लेक्सवर कारवाई करण्यात येते. अतिक्रमण विभाग जप्त केलेल्या टपऱ्या, लोटगाड्या तसेच फ्लेक्स आणून महापालिकेच्या सतरा मजली इमारतीच्या आवारात मागील बाजूस लावत आहे. या ठिकाणी ठेवण्यात आलेले भंगार अतिशय ओंगळवाणे दिसते. याबाबत अनेक वेळा तक्रारीही करण्यात आली मात्र महापालिकेचे अतिक्रमण विभाग याच ठिकाणी ते ठेवत आहे.
जनतेच्या जीवावर उठले
सतरा मजली प्रशासकीय इमारतीच्या आवारात ठेवलेल्या या जप्त केलेल्या अतिक्रमणाच्या सामानात टपऱ्या तसेच पत्रेही आहेत. जोरदार वारा आल्यास या टपऱ्यावरचे पत्रे उडत असतात. गोलाणी संकुल परिसरात नागरिकांची नेहमी ये-जा सुरू असते. हे उडालेले पत्रे व फ्लेक्स अनेक वेळा या परिसरात पडलेले असतात. सुदैवाने अद्याप कोणालाही ते लागलेले नाहीत, मात्र अनेक नागरिक त्यापासून वाचले आहेत. मात्र एखाद्या वेळेस एखाद्या नागरिकाला लागण्याची शक्यता आहे.
महापालिकेने त्वरित हटवावे
महापालिकेने सतरा मजलीच्या आवारात ठेवलेले हे भंगार साहित्य तातडीने हटविण्याची गरज आहे. महापालिका आयुक्त विद्या गायकवाड शहरातील अतिक्रमण हटविण्याची कारवाई करीत आहेत. परंतु आपल्यात प्रशासकीय सतरा मजली इमारतीच्या आवारातील भंगार हटविण्याबाबत मात्र ते कारवाई करीत नाहीत. पावसाळ्यात जोराचा वारा सुटतो त्यामुळे या ठिकाणी ठेवलेले फ्लेक्स किंवा टपरीवरील पत्रे उडून एखाद्या व्यक्तीला लागून त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.
उडता फ्लेक्स आणि ‘ते’ बचावले
शहराती गोलाणी संकुलात रविवारी (ता. २२) दुकाने बंद असतात, परंतु काही दुकाने सुरू असतात, तर ऑफिसच्या कामासाठी काही जण येत असतात. दुपारी चार वाजेच्या सुमारात ई विंगमधील चौथ्या मजल्यावर असलेल्या चार्टर्ड अकौटंट आफिसमधील कर्मचारी कामासाठी आले होते. संकुलातील कांकरीया रेफ्रीरेटरजवळ आपले वाहन ते पार्क करीत असताना, सतरा मजली इमारतीवर ठेवलेले फ्लेक्स वाऱ्यामुळे उडले त्यातील एक फ्लेक्स त्यांच्या डोक्यावरून जाऊन बाजूला पडला सुदैवाने त्यांना तो लागला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.